Kolkata Rape Murder Case : कोलकाता येथील कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि खून प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली आहे. सीजेआई डीवाई चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील NA खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करणार आहे. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. त्याचबरोबर याप्रकरणी एसआयटीही स्थापन करण्यात आली आहे.
महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाविरोधात देशभरात निदर्शने सुरू आहेत. या घटनेतील सर्व आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी विविध रुग्णालयातील डॉक्टरांनी केली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने देखील (आयएमए) दोषींना कठोर शिक्षा व्हावी, असे म्हटले आहे. याशिवाय या घटनेच्या तपास करून डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी तातडीने पावले उचलण्यात यावीत असेही म्हंटले आहे.
संपूर्ण प्रकरण
कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरचा मृतदेह गूढ परिस्थितीत मृतदेह आढळून आला. प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टर रुग्णालयात दुसऱ्या वर्षाची पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थिनी होती आणि चेस्ट मेडिसिन विभागात गृह कर्मचारी म्हणूनही काम करत होती. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना तिचा मृतदेह आपत्कालीन इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आढळून आला.
डॉक्टरांचा निषेध
याप्रकरणी सीबीआय तपास करत आहे. राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही हे प्रकरण जलदगती न्यायालयात नेण्याचे निर्देश दिले आहेत. गरज पडल्यास आरोपींना फाशीची शिक्षा दिली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. डॉक्टरांचा विरोध पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने त्यांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे.
मंत्रालयाच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, आरोग्य व्यावसायिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल. फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन आणि दिल्लीच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांच्या निवासी डॉक्टर्स असोसिएशनच्या प्रतिनिधींनी दिल्लीत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर हे आश्वासन दिले आहे.