काही दिवसांपूर्वीच कोलकत्ता येथे डॉक्टर तरुणीवर अत्याचार करून तिची क्रूरपणे हत्या केल्याची घटना घडली होती.ही घटना ताजी असतानाच बदलापूरमध्ये देशाला हादरवणारी भयानक घटना घडली आहे. बदलापूर येथे आदर्श विद्यामंदिर शाळेत चार आणि सहा वर्षांच्या चिमुकलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. शाळेतील सफाई कामगार व्यक्तीनेच लहान चिमुकल्यांवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. अनेक ठिकाणी या घटनेमुळे आंदोलन करण्यात येत असून आंदोलनामार्फत न्यायाची मागणी केली जात आहे.कलाक्षेत्रातून देखील या घटनेवर प्रतिक्रिया येत आहेत. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने या घटनेवर संताप व्यक्त करत इंस्टाग्रामवर प्रतिक्रिया दिली आहे.
इंस्टाग्रामवर सिद्धार्थ चांदेकर आपल्या स्टोरीमध्ये म्हणतो की,”मुलींनी आपली संस्कृती जपली पाहिजेत म्हणजे त्यांच्याकडे कोणी बघणार नाही असे लोक म्हणतात पण बदलापूर घटनेतल्या लहान मुलींना तर संस्कृती या शब्दाचा अर्थही माहीत नसेल. या चिमुकल्या जीवांवर अत्याचार करणे ही विकृती आहे. या विकृत पुरुषांना ‘मानवी हक्क’ नसावेत! कसलाही अधिकार नसावा! त्यांना जगण्याचाही अधिकार नसावा !,
काही दिवसांपूर्वीच कोलकत्ता येथे डॉक्टर तरुणीवर अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना घडली होती. या घटनेवरही सिद्धार्थ चांदेकरने प्रतिक्रिया व्यक्त केली होती “आपल्या घरातली मुलगी संध्याकाळी सातच्या आत घरात परत येतेय की नाही हे बघण्यापेक्षा आपल्या घरातला मुलगा संध्याकाळी सातनंतर कुठे जातो, काय करतो, त्याची संगत काय आहे, तो कोणाशी बोलतोय, त्याचे काय विचार आहेत , हे बघनये जास्त गरजेचे आहे. या देशातला मुलगा सुसंस्कृत झाला, स्त्रियांचा आदर करायला शिकला तरच या देशाची प्रगती झाली” असे म्हणता येईल”.