सध्या देशभरात बदलापूर येथे घडलेल्या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. बदलापूरमधील आदर्श विद्यालयामधीलसफाई कामगाराने ३ वर्षांच्या २ चिमुकल्यांवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. शाळेत असा प्रकार घडणे हे अतिशय धक्कादायक आहे. . या घटनेच्या निषेधार्त बदलापूर येथे आंदोलन देखील केले आहे. या घटनेमुळे देशभरातून संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी देखील यावर वक्तव्य केले आहे. सिनेसृष्टीमधील अनेक कलाकारांनी देखील या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख याने देखील या घटनेवर भाष्य केले आहे. त्याच्या या वक्तव्याकडेच सर्वांचे लक्ष वेधले आहे. अभिनेता रितेश देशमुख याने अतिशय तीव्र शब्दांत या घटनेचा निषेध केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत तो म्हणाला आहे की, स्रीयांवर अत्याचार करणाऱ्या अशा नराधमांसाठी शिवरायांच्या काळातील शिक्षेची तरतूद हवी. छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या काळात अशा घटनेत आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हायची. ती शिक्षा आज या नराधमाला द्यायला हवी. त्याचा ‘चौरंग’ करा. अशा शब्दात रितेश देशमुखने आपला राग व्यक्त केला आहे.
या घटनेवर बोलताना रितेश देशमुख म्हणाला आहे की,” एक पालक म्हणून माझा संताप होतो आहे. शाळा ही विद्यार्थ्यांसाठी स्वतःच्या घराइतकीच सुरक्षित असायला पाहिजे. परंतु दोन वर्षांच्या मुलींवर शाळेतच सफाई कामगारानेच अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या राक्षसाला लवकर कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात असे कृत्य करणाऱ्याला शिक्षा देण्यासाठी चौरंग शिक्षा हा कायदा तयार केला होता. तो कायदा पुन्हा आणण्याची आज गरज आहे” .
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्त्रियांवर झालेला अत्याचार कदापि खपवून घेतला जात नव्हता. याची अनेक उदाहरणे आजही दिली जातात. दरम्यान, चौरंग शिक्षा म्हणजे काय तर, आरोपीचे दोन्ही हात आणि पाय कलम करणे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रांझे गावच्या भिकाजी गुजर पाटलाने महिलेसोबत गैरकृत्य केल्याप्रकरणी त्याला ही शिक्षा महाराजांनी दिली होती.
अश्याच प्रकारची शिक्षा बदलापूर प्रकरणातील आरोपीला व्हायला हवी अशी मागणी रितेश देशमुखने आपल्या पोस्टमधून केली आहे. त्याच्या ह्या पोस्टचे नेटकऱ्यांनी देखील समर्थन केले आहे.