Narendra Modi : युक्रेनच्या भेटीपूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवशीय पोलंड दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी बुधवारी येथे पोहचले असून, 23 ऑगस्टला युक्रेनला रवाना होतील. यावेळी मोदींनी पोलंडमधील भारतीय समुदायाच्या लोकांना संबोधित केले.
भारतीय समुदायाच्या लोकांना संबोधित करताना मोदी म्हणाले, “दशक वर्षांपासून भारताचे धोरण सर्व देशांपासून अंतर राखण्याचे होते. मात्र, आजचा भारत सर्व देशांच्या सोबत आहे. आणि सर्वात आधी मदतीचा हाथ पुढे करणार देश आहे. युक्रेन दौऱ्यापूर्वी मोदींचे हे व्यक्तव्य सध्या चर्चेत आहे.
१९९१ मध्ये युक्रेनला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच भेट असेल. युक्रेन आणि रशियामध्ये सध्या संघर्ष सुरू आहे, या दृष्टिकोनातूनही ही भेट महत्त्वाची ठरणार आहे.
यावेळी मोदींनी अनेक प्रकरणात भाष्य केले आहे. यावेळी ते म्हणाले, “भारत आणि पोलंडच्या समाजांमध्ये अनेक समानता आहेत. एक मोठे साम्य लोकशाहीतही आहे…भारतातील लोकांचा लोकशाहीवर अतूट विश्वास आहे. हा विश्वास आपण पाहिला आहे. याचे उदाहरण म्हणजे नुकत्याच झालेल्या निवडणुका…आम्हाला भारतीय विविधता कशी जगायची आणि साजरी करायची हे माहित आहे, म्हणूनच आम्ही प्रत्येक समाजात सहज एकरूप होतो…”
“भारत नेहमीच शांततेचा समर्थक आहे. आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे, हे युद्धाचे युग नाही. मानवतेला धोका निर्माण करणाऱ्या आव्हानांविरुद्ध एकत्र येण्याची वेळ आली आहे. भारताचा संवादावर विश्वास आहे.”
पंतप्रधान मोदी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या निमंत्रणावरून युक्रेनला भेट देत आहेत. मोदी म्हणाले की, ते युक्रेनच्या नेत्यासोबत संघर्षाच्या शांततापूर्ण निराकरणाबाबत त्यांचे विचार मांडतील. मोदींची युक्रेन भेट त्यांच्या मॉस्को दौऱ्यानंतर जवळपास सहा आठवड्यांनी आली आहे. मोदींच्या मॉस्को दौऱ्यावर अमेरिका आणि त्यांच्या काही पाश्चात्य मित्र राष्ट्रांनी टीका केली होती.
पुढे मोदी म्हणाले, “45 वर्षांनंतर एक भारतीय पंतप्रधान पोलंडला आला आहे…असे अनेक देश आहेत जिथे एकाही भारतीय पंतप्रधानाने अनेक दशकांपासून भेट दिली नाही. पण आता परिस्थिती वेगळी आहेत.” अनेक दशकांपासून भारताचे धोरण सर्व देशांपासून समान अंतर राखण्याचे होते. आजच्या भारताचे धोरण सर्व देशांशी समानतेने जवळचे आहे…” ते म्हणाले, “दोन दशकांपूर्वी गुजरातमध्ये मोठा भूकंप झाला तेव्हा त्याचा फटका बसला होता. मग मदतीसाठी पोहोचणाऱ्या पहिल्या देशांपैकी पोलंड एक होता…”
मोदी म्हणाले, “आजच्या भारताला सर्वांशी जोडायचे आहे. आजचा भारत सर्वांच्या सोबत आहे आणि सर्वांच्या हिताचा विचार करतो, कोणत्याही देशावर संकट आले तर मदतीचा पहिला हात पुढे केला जातो. ते म्हणाले, “जगात कुठेही भूकंप किंवा कोणतीही आपत्ती आली तर भारताचे एकच तत्व आहे, मानवता धर्म आधी.”
“जगातील कोणत्याही देशावर जेव्हा संकट येते तेव्हा भारत हा पहिला देश आहे जो मदतीचा हात पुढे करतो…जेव्हा कोविड आला तेव्हा भारत म्हणाला ‘माणुसकी आधी येते’…भारत ही अशी भूमी आहे. भारत बुद्धाची ही वारशाची भूमी आहे.”