MPSC Student Protest : पुण्यात मंगळवार पासून MPSCच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) २५ ऑगस्टला होणाऱ्या परीक्षेत कृषि विभागाच्या २५८ पदांचा समावेश करावा तसेच आयबीपीएस आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन्ही एकाच दिवशी न ठेवता त्याची तारीख बदलण्यात यावी अशी मागणी केली होती.
आता विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला यश आले असून, प्रशासनाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आजच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेची तारीख लवकरात लवकर जाहीर करण्यात येईल, असा निर्णय जाहीर करण्यात आला. या निर्णयानंतर आंदोलक विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. मात्र, विद्यार्थ्यांनी आपला आंदोलनाचा पवित्रा कायम ठेवला आहे.
राज्यसभेच्या जागा वाढल्या पाहिजेत. या मागणीवर विद्यार्थी अद्यापही ठाम असून जोपर्यंत सर्वच्या सर्व मागण्या मान्य होत नाही. तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे विद्यार्थ्यांचे बोलले आहे.
आंदोलन फक्त परीक्षा पुढे ढकलण्यासाठी नव्हते तर राज्यसभेच्या जागा वाढीचा देखील निर्णय राज्य सरकारने त्वरित घेणे आवश्यक आहे. असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
कृषी सेवेचा 258 जागेबाबत अद्याप सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणं आहे.