सध्या देशभर आज चर्चा आहे ती म्हणजे भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट हिने केलेल्या एका वक्तव्याची. भाजप नेते आणि कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष ब्रिज भूषण सिंह यांच्या विरोधात न्यायालयात साक्ष देणाऱ्या महिलांची सुरक्षा काढून घेतली आहे असा आरोप विनेश फोगट हिने केला आहे.त्यानंतर देशभरात चर्चांना उधाण आले आहे.
रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या साक्षी मलिक आणि कुस्तीपटू विनेश फोगाट यांच्यासह सहा खेळाडूंनी ब्रूजभूषण सिंह यांच्या विरोधात अनेक आरोप केले होते. सहा खेळाडूंनी ब्रुजभूषण सिंह यांच्या विरोधात लैंगिक खेळाचे आरोप केले होते. भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केल्यावरती अनेक खेळाडूंनी आवाज उठवत जंतर-मंतरवर आंदोलने देखील केली होती. .
दिल्लीच्या एव्हेन्यू कोर्टाने ब्रिजभूषण सिंह यांच्यावर आरोप निश्चित केल्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला परंतु स्थानिक न्यायालयातून त्यांना जामीन मिळाल्याचे समोर आले होते. परंतु विनेश फोगाट हिने नुकतेच केलेल्या वक्तव्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाल्याचे दिसून येत आहे. भाजप नेते आणि कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष ब्रिज भूषण सिंह यांच्या विरोधात न्यायालयात साक्ष देणाऱ्या महिलांची सुरक्षा काढून घेतली आहे असे आरोप तिने केले आहेत. पण पोलिसांकडून तिने केलेले आरोप फेटाळून लावण्यात आले आहेत.
दिल्ली पोलिसांनी मात्र विनेशच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे यावेळी म्हटले आहे. दरम्यान, सुरक्षा जवानांना येण्यास उशीर होत असेल तर त्याची पूर्ण चौकशी करण्यात येईल परंतु सुरक्षा काढून घेण्याचे अद्यापही कोणतेच आदेश आले नाहीत असे दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.