आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर असताना राजकीय वर्तुळात एकमेकांवरती अनेक आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी करताना दिसत आहेत. जागा वाटपावरून आता बैठकी घेण्यास देखील सुरुवात झाली आहे. परंतु आता एकनाथ खडसे नक्की कोणाच्या बाजूने आहेत या चर्चांना उधाण आले आहे. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर वक्तव्य केले आहे.लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देऊन एकनाथ खडसे भाजप पक्ष प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र त्यानंतर ते प्रत्यक्षात मात्र घडलेले दिसून आले नाही.
खासदार सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारण्यात आला होता की एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात आहेत का? यावरती सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिला का ते भाजपामध्ये प्रवेश करणार का हे मला विचारण्यापेक्षा तुम्ही त्यांनाच विचारा. त्यांना विचारले तर या प्रश्नाचे उत्तर लवकर मिळू शकते. कारण मला याबाबत माहिती नाही मी याची माहिती घेऊन सांगते असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
लोकसभा निवडणुका पार पडल्यापासून एकनाथ खडसे हे भाजपामध्ये प्रवेश करणार अशा चर्चा होत होत्या. एकनाथ खडसे हे भाजपामध्ये जाण्यास उत्सुक आहेत असे देखील म्हटले जात होते. परंतु महाराष्ट्र भाजपातील काही नेते एकनाथ शिंदे यांना परत गटात घेण्यास उत्सुक नाहीत अशा चर्चा रंगताना दिसत आहेत.
दरम्यान, भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंची डायरेक्ट वरती लाईन आहे. खडसेंनाच डायरेक्ट जाऊन विचारा की त्यांचे नेमके स्टेटस काय आहे कारण सुप्रिया सुळे यांना माहिती नाही, जयंत पाटलांना माहिती नाही, शरद पवारांनाही माहिती नाही असे म्हणत टोमणा मारला आहे.