मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच घोषणा केली होती. या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांकडून अर्ज देखील मागवण्यात आले होते. यानंतर अनेक महिलांच्या खात्यावरती या योजनेचा पहिला हप्ता म्हणजेच 3000 रुपये देखील आले होते. परंतु अशा कितीतरी महिला होत्या ज्यांनी फॉर्म भरून देखील त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत.
तसेच अशा अनेक महिला आहेत ज्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले परंतु काही कारणास्तव बँकांनी ते पैसे कपात करून घेतले. त्यानंतर या घटनेची अनेक महिलांनी तक्रार देखील केली. महिलांच्या याच अडचणीची आता सरकारने दखल घेतली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत दोन कोटीपेक्षा जास्त महिलांचे अर्ज जमा झाले आहेत. एक कोटी आणि त्याच्यापेक्षा जास्त महिलांच्या खात्यावर पहिल्या हप्त्याची रक्कम देखील जमा झाली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक मदत करण्याचे सरकार काम करत आहे.
परंतु अनेक महिलांच्या खात्यांवरून हे पैसे कपात करण्यात येत आहेत. मिनिमम अकाऊंट बॅलेन्स न ठेवल्यामुळे लागणारे चार्जेस तसेच दंडात्मक कारवाई या नावाखाली अनेक बँकांकडून महिलांच्या या तीन हजार रुपयांमधून पैसे कपात करण्यात आले होते. यामुळेच अनेक महिलांनी याची तक्रार केली. माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे बँका आम्हाला देत नाहीत अशी महिलांनी तक्रार केली असून सरकारने आता या तक्रारीची दखल घेतली आहे.
राज्य सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाने याबाबत सूचना जारी केल्या आहेत. एक्स या समाजमाध्यमाच्या खात्यावरून महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. महिला लाभार्थ्याचे कोणतेही कर्ज थकीत असले तरी देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे कपात करू नयेत अशी बँकांना सूचना देखील देण्यात आली आहे.
दरम्यान, आता लाडकी बहिण योजनेचे पैसे बँकांकडून कापले जाणार नाहीत त्यामुळे राज्यातील अनेक महिलांना दिलासा मिळाला आहे.