हरियाणा विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत.असे असतानाच आता भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. विनेश फोगाट काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का असा प्रश्न सर्वांना पडला आहे.काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांची विनेश फोगाट हिने काळ भेट घेतली होती यानंतर कुस्तीपटू विनेश फोगाट काँग्रेसमध्ये प्रवेश करणार याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. .
नुकत्याच झालेल्या पॅरिस ऑलम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू, विनेश फोगाटला शंभर ग्रॅम वजन वाढल्यामुळे अंतिम फेरीतून बाद करण्यात आले होते. यावरून विनेश फोगाट ही एक चर्चेचा विषय ठरली होती. परंतु पॅरिस ऑलिंपिक मधून भारतात परतल्यानंतर तिचं मोठ्या उत्साहात स्वागत देखील करण्यात आले होते.
काल झालेल्या प्रियंका गांधी आणि विनेश फोगट यांच्या भेटीबाबत काँग्रेस नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेस नेते भूपेंद्र सिंह हुड्डा म्हणाले आहेत की खेळाडू हे कोणत्याच पक्षाचे नसतात ते संपूर्ण देशाचे असतात. मग विनेश फोगाट काँग्रेसमध्ये प्रवेश करणार या चर्चा सुरू आहेत परंतु हा एक काल्पनिक प्रश्न आहे. तसेच विनेश फोगाटला राज्यसभेसाठी उमेदवारी दयायला हवी कारण ती आपल्या देशाची खेळाडू आहे असे देखील ते यावेळी म्हणाले आहेत.
सरकारने विनेश फोगाटसाठी रौप्य पदक सन्मानाची घोषणा केली असली तरी तिला सुवर्णपदक विजेतेला जो मान दिला जातो तो मान देण्यात यावा अशी मागणी देखील त्यांनी यावेळी बोलताना केली आहे. या आधी देखील काँग्रेस नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी विनेश फोगाट हिला सुवर्णपदक विजेतेला जो मान दिला जातो तो मान मिळावा अशी मागणी केली होती.
दरम्यान, विनेश फोगाटवर अन्याय झाला असून तिला न्याय देखील मिळाला नाही. सचिन तेंडुलकर यांना जसे राज्यसभेवर जागा दिली होती तशीच कुस्तीपटू विनेश फोगाट हिला देखील देण्यात यावी. अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.