India Most Popular Chief Minister : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री बनले आहेत. प्रतिष्ठित माध्यम समूहाच्या ‘मूड ऑफ द नेशन’ सर्वेक्षणात जनतेने योगी यांना प्रथम क्रमांकाचे मुख्यमंत्री म्हणून निवडले आहे. देशभरातील 1.36 लाखांहून अधिक लोकांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात 33 टक्क्यांहून अधिक लोकांनी योगींना सर्वोत्तम मुख्यमंत्री मानले आहे.
तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दुसरे स्थान मिळाले आहे. मात्र त्यांना पूर्वीपेक्षा कमी पाठिंबा मिळाला आहे. ऑगस्ट 2024 मध्ये, 13.8 टक्के लोकांनी त्यांना सर्वोत्तम मुख्यमंत्री मानले, तर फेब्रुवारी 2024 मध्ये, 19.6 टक्के आणि ऑगस्ट 2023 मध्ये, 19.1 टक्के लोकांनी त्यांना पाठिंबा दिला.
या यादीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तिसऱ्या स्थानावर आहेत. कोलकाता घटनेनंतरही त्यांच्या लोकप्रियतेचा आलेख पूर्वीच्या तुलनेत वाढला आहे. ऑगस्ट 2024 मध्ये, 9.1 टक्के लोकांनी त्याला पाठिंबा दिला, जी मागील सर्वेक्षणापेक्षा थोडी वाढ आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांना 4.7 टक्के लोकांचा पाठिंबा मिळाला, जो फेब्रुवारी 2024 मध्ये 5.5 टक्के आणि ऑगस्ट 2023 मध्ये 5.6 टक्के पेक्षा कमी आहे. तसेच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना ४.६ टक्के लोकांचा पाठिंबा मिळाला आहे. या सर्वेक्षणात त्यांचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही यावेळी चांगला पाठिंबा मिळाला आहे. ते सहाव्या स्थानी विराजमान आहेत. ऑगस्ट 2024 मध्ये 3.1 टक्के लोकांनी त्यांना पाठिंबा दिला, जो फेब्रुवारी 2024 मध्ये 1.9 टक्के आणि ऑगस्ट 2023 मध्ये 1 टक्के होता.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी, आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनाही थोडाफार पाठिंबा मिळाला, पण ते सर्वोच्च स्थानी पोहोचू शकले नाहीत.
काळानुसार जनतेचे प्राधान्यक्रम आणि आवडी-निवडी बदलत गेल्याचे मूड ऑफ द नेशन सर्वेक्षणातून स्पष्टपणे दिसून आले. एकीकडे काही मुख्यमंत्री आपल्या कामगिरीने जनतेची मने जिंकण्यात यशस्वी ठरले तर दुसरीकडे काहींना पाठिंब्याचा अभाव जाणवला.