गोकुळामध्ये होता ज्याचा वास,
गोपिकांसोबत ज्याने रचला रास,
यशोदा, देवकी ज्याची मैय्या
तोच साऱ्यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैय्या……
आज देशभरात कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे . श्रीकृष्ण यांना विष्णूचा आठवा अवतार मानले जात असून भारतीय देवतांमध्ये अत्यंत प्रिय देवता मानले जाते. कृष्णाचा जन्मदिवस दरवर्षी कृष्ण जन्माष्टमीला चंद्रसौर हिंदू दिनदर्शिकेनुसार साजरा करतात, जो साधारणपणे ऑगस्टच्या उत्तरार्धात किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला येतो.
श्रीकृष्णाने केलेली कार्य आणि त्यांचे जीवन आदर्श मानले जाते. भारताला अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवांची समृद्ध परंपरा आहे. कृष्ण जन्माष्टमी ही त्यापैकीलच एक असून सर्वात महत्त्वाची आहे. जी धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणात साजरी केली जाते. कृष्ण जन्माष्टमी हा उत्सव विविध सामाजिक , धार्मिक लोकांना एकत्र आणण्याचे काम करत असतो. कृष्ण जन्माष्टमी साजरी करत असताना समाजातील प्रत्येक घटकांमध्ये एकमेकांप्रती प्रेमाची भावना निर्माण होत असते. कृष्ण जन्माष्टमी हा हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा सण समजला जातो.
कृष्ण जन्माष्टमी दरम्यान होणारा सर्वात लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे दहीहंडी. हा एक लोकप्रिय कार्यक्रम आहे, ज्यामध्ये सर्व भक्त एकत्र येऊन लहान पाट्या किंवा घासांनी भरलेल्या हांडीला उचलण्यासाठी एकमेकांच्या खांद्यावर उभे राहून एकावर एक थर लावले जातात आणि वरती रशीला बांधलेल्या दहीहंडीला फोडण्यासाठी एकावरती एक थर उभे करून हंडी फोडली जाते. हा खेळ म्हणजे कृष्णाच्या काळातील दही लोणी चोरण्याच्या प्रकाराचं प्रतीकच आहे.
या दिवशी मंदिरांमध्ये विशेष भजन आणि कीर्तनांचे देखील आयोजन केले जाते. भजन कीर्तनाच्या माध्यमातून सर्व भक्त भगवान श्रीकृष्णाची स्तुती करत भजन गाणी या माध्यमातून आपली सेवा अर्पण करतात. या दिवशी सर्व भक्तांना मंदिरामध्ये प्रसाद देखील वाटला जातो. मथुरा आणि वृंदावन येथे कृष्ण जन्माष्टमी अत्यंत धूमधडाक्यात साजरी केली जाते, कारण या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म झाला असे म्हटले जाते. या दिवशी मथुरा आणि वृंदावनमधील मंदिरं, श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर आणि गोवर्धन मंदिर सजवली जातात. मंदिरे रंगीत फुलांनी, दिव्यांनी सजवली जातात.
श्रीकृष्णाने कुरुक्षेत्र युद्धाच्या वेळी अर्जुनाला भगवतगीतेचा उपदेश दिली, अर्जुनाला भगवद्गीता सांगितली. जी हिंदू संस्कृतीत अतिशय महत्त्वाची मानली जाते . श्रीकृष्णाच्या जीवनातील अनेक कथा आणि लीलांमध्ये प्रेम, दया, आणि धैर्य यांचे वर्णन आहे. यामध्ये त्यांची बाललीला, गोवर्धन उचलणे, दहीहांडी फोडणे, आणि राधा-कृष्णाची प्रेमकथा यांचा समावेश आहे. याचसोबत श्रीकृष्ण यांनी संपूर्ण मानव जातीला मानवी जीवनाला, सर्वांना प्रेम आणि करुणेचा संदेश दिला आहे.