राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची अचानक प्रकृती बिघडली आहे. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची परिस्थिती स्थिर झाली असून त्यांच्यावर उपचार चालू ठेवण्यास सांगण्यात आले आहेत. दोन दिवसांपासून बाबा सिद्दिकी हे रुग्णालयात आहेत. फूड पॉयझनिंग झाल्यामुळे त्यांना अचानक त्रास होयला सुरुवात झाली होती.
मुंबईतील राजकारणातलं चर्चेत असणारा नाव म्हणजे बाबा सिद्दिकी. सध्या ते राष्ट्रवादी अजित पवार गटात आहेत याआधी ते काँग्रेसमध्ये होते. वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून ते सर्वात पहिल्यांदा 1999 साली निवडून आले होते. आघाडी सरकार मधून ते मंत्री देखील आहेत. नोव्हेंबर 2004 ते डिसेंबर 2008 या काळात कामगार, अन्ननागरी पुरवठा, अन्न व औषध प्रशासन खात्याचं राज्यमंत्रिपद देखील बाबा सिद्दिकी यांच्याकडे होते.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याकडून देशभरात ‘जनसन्मान यात्रा’ सुरू आहे. या ‘जनसन्मान यात्रेत’ बाबा सिद्दिकी यांनी सहभाग नोंदवला होता. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुरू करण्यात आलेली ‘जनसन्मान यात्रा’ 20 ऑगस्टला मुंबईमध्ये होती. यामध्ये बाबा सिद्दिकी हे देखील सहभागी होते यासोबत त्यांचे पुत्र झिशान सिद्दिकी देखील सहभागी होते.
या जनसन्मान यात्रेनंतरच बाबा सिद्दिकी यांची प्रकृती खालावली आणि त्यांना मुंबई येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबईत भरवण्यात आलेल्या जनसन्मान यात्रेत महिलावर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी होता. वांद्रे पश्चिम मतदारसंघ सोडून वांद्रे पूर्व मतदारसंघासाठी 2019 च्या विधानसभा निवडणूकीसाठी बाबा सिद्दिकी यांनी तयारी केली होती.
परंतु त्यावेळी ते स्वतः विधानसभा निवडणूक न लढता त्यांचा मुलगा झिशान सिद्दिकी याला त्यांनी निवडणुकीसाठी उभे केले आणि झिशान सिद्दिकी यांनी ही निवडणूक जिंकली देखील होती.