युक्रेनने रशियावर मागील अडीच वर्षांतील सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला आहे. युक्रेनने रशियाच्या सारातोव परिसरात अमेरिकेवरील 9/11 सारख्या ड्रोन हल्ल्यांचा वापर करून मोठे आक्रमण केले आहे. या हल्ल्यात युक्रेनने सारातोवमधील अनेक उत्तुंग इमारतींवर ड्रोन हल्ला करून मोठ्या प्रमाणावर नासधूस केली. युक्रेनने रशियावर वाढवलेली हल्ल्यांची तीव्रता पाहता युद्धाच्या परिस्थितीला एक नवीन वळण मिळण्याची शक्यता असल्याचे दिसून येत आहे.
रशिया युक्रेनच्या या हल्ल्यावर मोठे उत्तर देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. युक्रेनने रशियासारख्या बलाढ्य देशावर अशा प्रकारे हल्ला करणे हे युद्धातील तणाव अधिक वाढवणारे ठरू शकते. युक्रेनने आधीच स्पष्ट केले आहे की, रशिया हे युद्ध एकतर्फी जिंकणार नाही. युक्रेन आणि रशिया युद्धाचे अभ्यासक यांच्या सांगण्यानुसार वोलोदिमीर झेलेन्स्की यांना या हल्ल्यामुळे मोठ्या परिणामांचा सामना करावा लागू शकतो.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा संताप वाढल्याने ते मोठा निर्णय घेऊ शकतात. या हल्ल्यामुळे रशिया युक्रेनला जशास तसे उत्तर देण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, युद्धाची स्थिती आणखी गंभीर होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
युक्रेनने मागील आठवड्यात 45 ड्रोन वापरून रशियावर हल्ला केला होता.मात्र रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की,11 ड्रोन्स नष्ट करण्यात आले, तर ब्रायंस्कमध्ये 23, बेलगोरोदवर 6, कलुगा येथे 3 आणि कुर्स येथे 2 ड्रोन्स नष्ट करण्यात आले. युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यांनी रशिया आणि युक्रेनमधील तणाव आणखी वाढला आहे आणि याचे परिणाम आगामी काळात अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.