छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी घटना समोर आली आहे. आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला भाजप कार्यकर्त्यांनी विरोध करत जोरदार आंदोलन केले आहे. आदित्य ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण आणि वैजापूर तालुक्यात शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी भेटी देणार आहेत, परंतु त्याआधीच छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार संघर्ष झाला आहे.
आदित्य ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत, त्या हॉटेलबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालीयन प्रकरणात जबाब द्या अशा मागणीसह आंदोलन केले. भाजप कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.त्याचबरोबर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी देखील हॉटेलबाहेर मोठ्या प्रमाणात आक्षेप घेतला.
यामुळे दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद होऊन परिस्थिती तणावपूर्ण झाली. या संघर्षावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करावा लागला. दरम्यान पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे आणि घटनास्थळी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अतिरिक्त फौज तैनात करण्यात आली आहे.
आज आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते पैठण आणि वैजापूर तालुक्यात शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. परंतु, भाजपने आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्यावर विरोध दर्शवून आंदोलन केल्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण झाल्याचे दिसून येत आहे.