2011 पासून सुरू असलेले मुंबई गोवा महामार्गाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. 471 किलोमीटर चौपाटीकरणाचे हे काम आहे. मुंबई गोवा या महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे झाले आहेत. समृद्धी महामार्गाचे काम मागून सुरु होऊनही पूर्ण झाले परंतु मुंबई गोवा महामार्गाचे काम अजून देखील पूर्ण झाले नाही.
रस्ते मार्गाने कोकणात जाणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास यामुळे संकटात आला आहे. यावरूनच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मुंबई-गोवा महामार्ग 66 च्या दुरावस्थेबाबत मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रवींद्र वायकर यांनी पत्र लिहिले आहे. या पत्राची दखल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतली असून गणेशोत्सवापूर्वी हा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.
गणेशोत्सवापूर्वीच मुंबई गोवा महामार्गावरील सर्व खड्डे भरण्यात येऊन हा महामार्ग वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात येईल असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. संबंधित विभागाला पत्र लिहून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खड्डे बुजवण्याचे आदेश देखील आता दिले आहेत.
सुमारे 471 किमी असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम 2011 पासून सुरू आहे. मात्र, अद्याप हे काम पूर्ण झाले नसून ते रखडले आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे गणेशोत्सव, होळी तसेच मे महिन्याच्या सुट्टीत गावी जाणाऱ्या कोकणवासीयांचा प्रवास खडतर होतो. या रस्त्यावरून प्रवास करताना चाकरमान्यांना आपले कोकणातील घर गाठण्यासाठी 16 तासांपेक्षा जास्त वेळ लागतो.