पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना आता विस्कळीत वेळापत्रकाला सामोरे जावे लागणार आहे कारण, पश्चिम रेल्वेवर 35 दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. गोरेगाव ते कांदिवली यादरम्यान सहावी मार्गिका तयार करण्यात येणार आहे याच पार्श्वभूमीवर हा 35 दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
वांद्रे टर्मिनस आणि बोरिवली दरम्यानच्या पाचव्या-सहाव्या मार्गाचा गोरेगाव-कांदिवली विभाग हा भाग आहे. 4.5 किमी लांबीच्या सहाव्या मार्गाचे काम गोरेगाव कांदिवली या दरम्यान सुरू होणार आहे. 66 ते 700 लोकल फेऱ्या यादरम्यान बंद होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
ही मार्गिका तयार झाल्यानंतर याचा फायदा सर्वांनाच होणार आहे. ही मालिका तयार झाल्यावर वांद्रे टर्मिनसवर येणाऱ्या आणि जाणाऱ्या मेल-एक्स्प्रेससाठी दोन मार्गिका बनणार आहेत. गोरेगाव ते कांदिवली दरम्यानची मार्गीका बनल्यानंतर मार्गावरील रहदारीची घनता देखील कमी होणार आहे.
कोकण रेल्वेवर सध्या पावसाळी वेळापत्रक चालू राहणार आहे. 10 जून ते 31 ऑक्टोबर या कालावधीत प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हे पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात आले परंतु रेल्वे गाड्यांचा वेग कमी करण्यात रेल्वे प्रशासनाकडून कोणतेही नियम निघाले नाहीत कोकण रेल्वे समितीकडून असे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, मेगा ब्लॉकवेळी गणेशोत्सव असल्याने गणेशोत्सव काळात 11 ते 17 सप्टेंबर या काळात मार्गिकेचे काम बंद ठेवणार आहेत, असे देखील सांगण्यात आले आहे. गणेशोत्सव काळात प्रत्येक ब्लॉकमध्ये केवळ 130-140 गाड्या रद्द करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.