झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांच्या भाजप प्रवेशाला अखेर अधिकृत मान्यता मिळाली आहे. 30 ऑगस्ट रोजी शुक्रवारी ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विटरवर (एक्स) संदेश जारी करत ही माहिती दिली आहे.
त्यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितले की,चंपाई सोरेन यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. चंपाई सोरेन सोमवारी नवी दिल्लीत पोहोचले. येथे त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. गेल्या मंगळवारपासून त्यांचा हा दुसरा दिल्ली दौरा होता. यापूर्वीच्या दिल्ली दौऱ्यात त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चाच्या पक्ष नेतृत्वावर गंभीर आरोप केले होते. नवा पर्याय शोधण्याबाबतही ते बोलले. नंतर ते नवा पक्षही काढू शकतात अशी चर्चा होती. या दोन दौऱ्यांदरम्यान माजी मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी झारखंडमधील कोल्हान भागात आपल्या समर्थकांची भेट घेतली.
रणनीतीबाबत त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चाही केली होती. यानंतर पत्रकारांशी बोलताना चंपाईसोरेन यांनी नवा पक्ष काढण्याचे संकेत दिले होते.असाही काही अंदाज होता की जेएमएम वर नाराज असलेले चंपाई सोरेन, त्यांच्या काही कार्यकर्त्यांसह पक्षाबाहेर संधी शोधत आहेत. आता या सगळ्यावरून पडदा उचलण्यात आला आहे. हेमंत सोरेन यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक झाल्यानंतर चंपाई सोरेन यांना झारखंडचे मुख्यमंत्री करण्यात आले. फेब्रुवारी ते जुलै 2024 दरम्यान त्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवले होते. मात्र त्यानंतर हेमंत सोरेन त्यानंतर त्यांच्याकडून बळजबरीने राजीनामा घेण्यात आला होता.मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगातून बाहेर आलेल्या हेमंत सोरेन यांनी चंपाई यांना बाजूला सारत जुलैमध्ये झारखंडचे १३ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. .