Kolkata News Today : भाजपने बंगालमध्ये बुधवारी म्हणजेच उद्या 12 तासांच्या बंदची हाक दिली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली, ज्यात त्यांनी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या कथित क्रूरतेचा तीव्र निषेध केला. सुकांत मजुमदार म्हणाले की, पोलिसांच्या कारवाईचा निषेध करणे आणि विद्यार्थ्यांवरील अत्याचाराच्या घटनांवर प्रकाश टाकणे हा या बंदचा उद्देश आहे.
विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनाचे पोलिसांनी हिंसाचारात रुपांतर केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला, त्यामुळे राज्यातील लोकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. पत्रकार परिषदेदरम्यान मजुमदार म्हणाले, “पोलिसांनी कोणतेही कारण नसताना विद्यार्थ्यांवर लाठीमार केला आणि त्यांना बेदम मारहाण केल्याचे आम्ही पाहिले. ही लोकशाहीची हत्या असून त्याला विरोध करणे ही आपली जबाबदारी आहे.” असे त्यांनी म्हंटले आहे.
काय आहे प्रकरण?
आरजी कार मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ आज विद्यार्थ्यांनीकडून ‘नबन्ना मार्च’ची घोषणा करण्यात आली. आज शहरात पुन्हा एकदा हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी करू लागले, कर मेडिकल कॉलेजमधील घटनेमध्ये सामील असलेले आरोपी ममता यांच्याकडून वाचवण्यात आले असल्याचे म्हंटले जात आहे, यावरून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे, याच पार्श्ववभूमीवर आज विद्यार्थ्यांकडून नबन्ना आंदोलनाची घोषणा करण्यात आली.
या आंदोलनाने कोणतेही हिंसक वळण घेऊ नये म्हणून सकाळपासून शहरात ठिकठिकाणी हजारो संख्येने पोलीस तैनात करण्यात आले होते. काही वेळात अंदोलन सुरु झाले मात्र नंतर पोलिसांकडून विद्यार्थ्यांनावर लाठीचार्ज करण्यात आला, विध्यार्थी हे आंदोलन शांततेने करत होते, मात्र पोलिसांनी अचानक लाठीचार्ज सुरु केला असल्याचा आरोप करत, भाजपने उद्या बंगाल बंदची हाक दिली आहे.