Shivaji Maharaj Statue Collapsed : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये राजकोट किल्ल्याच्या परिसरात उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यांतच कोसळल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी 26 ऑगस्ट रोजी घडली. यावरून आत राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे. तसेच राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
काल घडलेल्या या घटनेनंतर आता विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे, या घटनेनंतर पोलिसांनी पहिली कारवाई करत दोघांवर गुन्हा देखील दाखल केला आहे. याप्रकरणी कंत्राटदार जयदीप आपटे आणि डॉ. चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा पुतळा कोसळल्याची बातमी समोर येताच राणे कुटुंबाकडून काय प्रतिक्रिया येते याबद्दल सोशल मीडियावर चर्चा होती. मात्र, आता राणे कुटूंबियांनी यावर भाष्य केले आहे. स्थानिकमाध्यमांशी बोलताना निलेश राणेंनी म्हटलं आहे. “जे घडलं आहे ते फार दूर्भाग्यपूर्ण आहे. असं व्हायला नको होतं. ज्याची चूक असेल त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई केली पाहिजे. कंत्राटदार असो किंवा अधिकारी असो त्यांच्यावर कारवाई करा अशी आमची मागणी आहे. आम्ही याचा पाठपुरावाही करु. आम्ही सरकारमध्ये बसलो आहोत. दोषींवर कठोर कारवाई नक्की केली जाईल,”
तसेच पुढे बोलताना निलेश राणेंनी, “हा पुतळा पुन्हा या ठिकाणी उभा करण्यासाठी जे काही करावं लागेल त्यासाठी तातडीने पावले उचलली जातील,” असे आश्वासनही दिले आहे.
मालवण किल्ले राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पूर्णाकृती पुतळा दुर्घटनाग्रस्त झाल्याची अत्यंत वाईट घटना काल घडली. आज या पार्श्वभूमीवर किल्ले राजकोट येथे भेट देऊन परिस्थितीची पहाणी केली. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई सोबतच त्याच ठिकाणी पुन्हा भव्य दिव्य पुतळा लवकरात… pic.twitter.com/CYFoMDHw2K
— Nilesh N Rane (Modi ka Parivaar) (@meNeeleshNRane) August 27, 2024
या स्मारकाला दुर्घटनेनंतर भेट दिल्याचे फोटोही निलेश राणेंनी आपल्या X वर पोस्ट केले आहेत. “मालवण किल्ले राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पूर्णाकृती पुतळा दुर्घटनाग्रस्त झाल्याची अत्यंत वाईट घटना काल घडली. आज या पार्श्वभूमीवर किल्ले राजकोट येथे भेट देऊन परिस्थितीची पहाणी केली. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई सोबतच त्याच ठिकाणी पुन्हा भव्य दिव्य पुतळा लवकरात लवकर उभा राहणार,” असं कॅप्शनही त्यांनी दिले आहे.