Kevan Parekh : भारतीय वंशाचे केविन पारेख यांची आता Apple Inc मध्ये मुख्य आर्थिक अधिकारी (CFO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ते कंपनीत उपाध्यक्ष आहेत. 52 वर्षीय केविन पारेख 1 जानेवारी 2025 पासून कंपनीत CFO पदाची सूत्रे हाती घेतील. याआधी लुका मेस्त्री कंपनीत सीएफओ पदावर होते.
Apple मध्ये 11 वर्षे सेवा देत आहेत
केविन पारेख 11 वर्षांपासून ॲपलमध्ये सेवा देत आहेत. कंपनीच्या आर्थिक रणनीती आणि कामकाजात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
मानधन
मीडिया रिपोर्ट्सनुसार, केविन पारेख यांना सीएफओ पदासाठी 243 हजार डॉलर्स पगार मिळणार आहे. यामध्ये दरवर्षी ७४ हजार डॉलर्सचे प्रोत्साहन दिले जाणार आहे. याशिवाय बोनस, स्टॉक, कमिशन, नफा शेअरही मिळू शकतो.
कुठून झाली करियरची सुरुवात ?
केविन पारेख यांनी मिशिगन विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी शिकागो विद्यापीठातून एमबीएचे शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी थॉम्पसन रॉयटर्स आणि जनरल मोटर्ससारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम केले. त्यांनी चार वर्षे रॉयटर्सच्या फायनान्स टीममध्ये उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्याच वेळी, त्यांनी जनरल मोटर्समध्ये व्यवसाय विकास संचालक पदावर काम केले.
सीएफओ होण्यासाठी खूप दिवसांपासून तयारी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, केविन पारेख CFO पदासाठी बऱ्याच दिवसांपासून तयारी करत होते. याआधी त्यांनी विक्री, रिटेल आणि मार्केटिंग विभागही सांभाळले होते. अशा परिस्थितीत त्यांना ॲपलच्या व्यवसायाची चांगलीच समज आहे.