मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचे निधन झाले असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी सुहासिनी देशपांडे यांनी अखेरचा श्वास घेतला. सुहासिनी यांच्या जाण्याने कलाविश्वात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी, सून, जावई आणि चार नातवंडे असा परिवार आहे. आज सकाळी ११. ३० वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मराठीमध्ये चित्रपटांबरोबरच त्यांनी नाटकांमध्येही आपला ठसा उमटवला होता. मराठीसोबतच त्यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले. 2011 मध्ये त्या रोहित शेट्टीच्या सिंघम मध्ये दिसल्या होत्या. हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.त्यांनी वयाच्या अगदी बाराव्या वर्षापासून अभिनयाला सुरुवात केली होती.‘सोळावं वरीस धोक्याचं’, ‘एक तमाशा सुंदर’ अशी काही त्यांनी केली. पुण्यातील डेक्कन प्रभात नवयुग सारख्या स्टुडिओमधून त्यांनी नृत्य कलाकार आणि ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम केले.
मराठी चित्रपटसृष्टीतील मोठे नाव असलेल्या सुहासिनी यांनी मराठी चित्रपटात आपल्या अभिनयाची अमिट छाप सोडली. त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये मानाचं कुंकू (1981), कथा (1983), आज झाले मुक्त मी (1986), आई शपथ (2006) आणि चिरंजीव (2016) या चित्रपटांचा समावेश आहे. सिनेमांबरोबर त्यांच्या नाटकांमधल्याही भूमिका चांगल्याच गाजल्या.
तुझं आहे तुजपाशी’, ‘रखेली’, ‘कथा अकलेच्या कांद्याची’, ‘राजकारण गेलं चुलीत’, ‘चिरंजीव आईस’, ‘सासूबाईंचं असंच असतं’ ह्या नाटकांमधील त्यांच्या भूमिका विशेष लोकप्रिय ठरल्या.