Jay Shah : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) नवे अध्यक्ष कोण असतील? याबाबतचा सस्पेन्स आता संपला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह आता आयसीसीचे नवे बॉस बनले आहेत. त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. आता ते ग्रेग बार्कले यांची जागा घेतील, ज्यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर रोजी संपत आहे.
बर्कले यांनी अलीकडेच अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतली होती. आता जय शाह हे १ डिसेंबरला पदभार स्वीकारतील. पदभार स्वीकारताच ते इतिहास रचतील. ते आयसीसीचे सर्वात तरुण अध्यक्ष असतील.
जय शहा यांच्या बिनविरोध निवडीनंतर आयसीसीमध्ये भारताचा दबदबा पुन्हा एकदा वाढला आहे. आयसीसीचे अध्यक्ष बनणारे शहा हे पाचवे भारतीय आहेत. त्यांच्या आधी जगमोहन दालमिया, शरद पवार, एन श्रीनिवासन आणि शशांक मनोहर हे आयसीसीचे बॉस राहिले आहेत.
शाह यांना बीसीसीआयचे सचिवपद सोडावे लागणार
ICC नियमांनुसार, अध्यक्षपदाच्या निवडणुकीत 17 मते आहेत आणि विजेत्यासाठी 9 मतांचे साधे बहुमत (51 टक्के) आवश्यक आहे. शाह यांना आयसीसी बोर्डाच्या 15 सदस्यांचा पाठिंबा असल्याचे मानले जात आहे. शाह हे आयसीसी बोर्डातील सर्वात प्रभावशाली चेहऱ्यांपैकी एक आहेत. ते सध्या आयसीसीच्या शक्तिशाली वित्त आणि व्यावसायिक व्यवहार उप-समितीचे प्रमुख आहेत. २०२२ मध्ये ते या उपसमितीचे अध्यक्ष झाले. नियमानुसार शाह यांना आता पासून बीसीसीआयचे सचिवपद सोडावे लागणार आहे. बोर्डाची सर्वसाधारण सभा पुढील महिन्यात किंवा ऑक्टोबरमध्ये होणार आहे.