Bangla Bandh : भाजपच्या बंगाल बंदवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींसह संपूर्ण भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. राजीनामा मागायचा असेल तर आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजीनामा मागा, असे ममता बॅनर्जी यांनी म्हंटले आहे. यावेळी त्यांनी ईडी, सीबीआय हे सगळे घोटाळेबाज असल्याचे देखील म्हंटले आहे. यांच्याकडून लोकांचा छळ होत आहे. काल रस्त्यावर उतरलेले सर्व बाहेरचे लोक आहेत. असेही आरोप त्यांनी केले आहेत.
कोलकाता येथील आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयातील ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून खून केल्याच्या घटनेने पश्चिम बंगालमधील वातावरण आता चांगलेच तापले आहे. भाजपसह विविध संघांकडून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या घटनेत सरकार दोषी असल्याचे म्हंटले जात आहे.
अशा परिस्थितीत ममता बॅनर्जी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी काल ‘नबन्ना मार्च’ची घोषणा केली. आणि हजारोंच्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले, विध्यार्थ्यांच्या या आंदोलनात पोलिसांनी लाठीचार्च करून शांततेत चालणारे आंदोलन हिंसाचाराकडे नेले असा आरोप करत भाजपने काल २८ ऑगस्ट रोजी बंगाल बंदची घोषणा केली.
आज सकाळपासूनच बंगाल मधील वातावरण तापले असून, अनेक ठिकाणी भाजप आणि तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. तसेच या आंदोलनात गोळीबार झाल्याची घटना देखील समोर आली आहे.
बंगालमधील पेटलेले वातावरण पाहता ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया देत पंतप्रधान मोदींसह संपूर्ण भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. राजीनामा मागायचा असेल तर आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजीनामा मागा, असे त्यांनी म्हंटले आहे.