आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांकडून एकमेकांवर टीका-टिप्पणी सुरू आहे. सर्व पक्षांकडून विधानसभा निवडणुकांची तयारी जोरदार सुरू आहे. अनेक पक्षांकडून मोर्चे बांधणीला सुरुवात देखील झाली आहे. असं असतानाच आता 125 जागांवर भाजप विधानसभा निवडणूक लढणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. यातील 25 जागांवर भाजपचा विजय नक्की आहे असे देखील सांगण्यात येत आहे.
मुंबईत भाजपच्या निवडणूक व्यवस्थापन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत भाजप किती जागांवर निवडणूक लढवणार याबाबत चर्चा झाली असून यातील किती जागांवर भाजपचा विजय नक्की होईल याविषयी देखील चर्चा करण्यात आली आहे. 125 जागांचे मिशन भाजपाने ठेवले आहे हे देखील यावेळी सांगण्यात आले.
यापैकी 50 जागांवर विजय नक्की होईल असा विश्वास भाजपाकडून व्यक्त केला गेला. राहिलेल्या 75 जागांवर देखील निवडून येण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालू आहेत असे देखील सांगण्यात आले आहे.
उरलेल्या ७५ जागांवर निवडून येण्यासाठी त्या जागा ज्या ज्या जिल्ह्यातील असतील त्या त्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यावर मतदार संघाची जबाबदारी देण्यात येणार आहे. यामध्ये जे मतदार संघ असतील त्या मतदारसंघातील वरिष्ठ नेते ग्राउंड लेव्हलला जाऊन काम करणार आहेत असे देखील सूत्रांनी दिलेल्या माहितीत सांगण्यात आले आहे.
या 75 जागांमधील मतदारसंघात जमेची बाजू कोणती. मतदार संघात काय कमतरता आहे, याच्यावर चर्चा करून हा देखील अहवाल राज्यातील भाजप वरिष्ठांना दिला जाणार आहे, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, उरलेल्या 75 जागांवर निवडून येण्यासाठी भाजप वेगळी रणनीती आखून विजयासाठी प्रयत्न करत आहे असे दिसून येत आहे.