Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोहन भागवत यांची सुरक्षा आता Z Plus वरून ASL (एडवांस्ड सिक्योरिटी लिएजॉन) करण्यात आली आहे. एएसएल सुरक्षा पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनाच दिली जाते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या सुरक्षेत वाढ कारण्याबात निर्णय घेण्यात आला होता. त्यांना आतापर्यंत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) ची झेड प्लस सुरक्षा होती.
का वाढवली सुरक्षा?
माहितीनुसार, आयबीच्या धमकीनंतर मोहन भागवत यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आता नव्या सुरक्षेनंतर मोहन भागवत यांना ज्या ठिकाणी जायचे आहे तेथे सीआयएसएफची टीम आधीच हजर राहणार आहे. सध्या 58 कमांडो त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत.
त्यांना मिळणाऱ्या एएसएल या वाढीव सुरक्षा यंत्रणेमध्ये देशातील कुठल्याही भागात स्थानिक प्रशासन, पोलीस, आरोग्य, अन्न व औषध प्रशासन यांचा समावेश असणार आहे. कुठलाही धोका टाळण्यासाठी मल्टी लेयर सुरक्षा यंत्रणा भागवत यांना पुरवण्यात येणार आहे.
डॉक्टर मोहन भागवत यांच्या राहण्याच्या व्यवस्थेबाबत, प्रवास, भेटी आणि बैठकांच्या स्थळी अतिशय कडक सुरक्षा प्रोटोकॉल पाळण्यात येणार आहेत. त्याचबरोबर त्यांच्या दौऱ्यांच्या पूर्वी सर्व ठिकाणी फॉलोअप घेऊन एक दिवसापूर्वी त्यांचा आढावा घेण्यात येणार आहे.
मोहन भागवत यांना झेड पल्स दर्जाची सुरक्षा देण्याआधी केंद्र सरकारने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ केली होती. त्यांना आता झेड पल्स दर्जाची सुरक्षा दिली आहे. केंद्र सरकारने नुकतीच याबाबत घोषणा केली होती. शरद पवारांना यांना जेड प्लस दर्जाची केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाची VIP सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.