Bharat Dojo Yatra : आज 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो आहे. यावेळी राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रे दरम्यानचा एक व्हिडिओ आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यात राहुल गांधी जिउ-जित्सू मार्शल आर्टचा सराव करताना दिसत आहेत. याचा व्हिडिओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये ‘भारत दोजो यात्रा’ असे लिहिले आहे.
व्हिडीओ शेअर करताना राहुल गांधींनी लिहिले की, “भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान आम्ही हजारो किलोमीटरचा प्रवास केला तेव्हा आमच्या शिबिराच्या ठिकाणी आमचा दिनक्रम असा होता की आम्ही रोज संध्याकाळी जिउ-जित्सूचा सराव करायचो, जी फिट राहण्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आम्ही ज्या शहरांमध्ये राहिलो त्या शहरांतील सहप्रवासी आणि तरुण मार्शल आर्ट्स विद्यार्थ्यांना एकत्र आणून याचा सराव करायचो.
त्यांनी पुढे लिहिले, या तरुणांना ‘जेंटल आर्ट’ची ओळख करून देणे हे आमचे ध्येय आहे. आमचा उद्देश त्यांच्या हिंसेचे सौम्यतेत रूपांतर करणे, त्यांना अधिक दयाळू आणि सुरक्षित समाज निर्माण करण्यासाठी साधने देणे हे होते. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त, मला माझा अनुभव तुम्हा सर्वांसोबत शेअर करायचा आहे, तुमच्यापैकी काहींना ‘जेंटल आर्ट’चा सराव करण्याची प्रेरणा मिळेल या आशेने आम्ही हा व्हिडिओ शेअर केला आहे. यासह त्यांनी शेवटी एका ओळीत लिहिले, “भारत डोजो यात्रा लवकरच येत आहे”
During the Bharat Jodo Nyay Yatra, as we journeyed across thousands of kilometers, we had a daily routine of practicing jiu-jitsu every evening at our campsite. What began as a simple way to stay fit quickly evolved into a community activity, bringing together fellow yatris and… pic.twitter.com/Zvmw78ShDX
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 29, 2024
डोजो म्हणजे काय?
डोजो एक मार्शल आर्टचा प्रकार आहे. ही स्वसंरक्षणाची प्रभावी कला म्हणून ओळखली जाते. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये राहुल गांधी मुलांसोबत मार्शल आर्ट करताना दिसत आहेत. ही स्वसंरक्षणासाठी एक कला असून त्यामुळे फिट आणि मन शांत राहण्यास मदत होते. या कलांचे प्रशिक्षण दिल्या जाणाऱ्या केंद्रांना किंवा संस्थांना ‘डोजो’ म्हटले जाते.
भारत जोडो यात्रा
राहुल गांधी यांनी 2022 मध्ये भारत जोडो यात्रा सुरू केली होती. त्यांनी सुमारे 150 दिवस पायी प्रवास केला होता, ज्यामध्ये अनेक लोक त्यांच्यासोबत होते. त्यांनी कन्याकुमारी ते काश्मीर आणि मणिपूर ते गुजरात असा भारतभर प्रवास केला. विधानसभा निवडणुकीत या भेटीचा त्यांना फारसा फायदा झाला नसला तरी. पण लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींना भारत जोडो यात्रेचा चांगलाच फायदा झाला.