सध्या देशभरात चर्चा आहे ती म्हणजे स्त्री-2 चित्रपटाची. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका केली आहे. या जोडीला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. या हॉरर कॉमेडी असलेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील आपली दखल घेणे भाग पाडले आहे.
2018 मध्ये स्त्री हा चित्रपट रिलीज झाला होता या चित्रपटाचा दुसरा भाग स्त्री 2 हा 2024 मध्ये 15 ऑगस्टला रिलीज झाला आणि प्रेक्षकांकडून याला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाने अनेक मोठ मोठे रेकॉर्ड तोडले आहेत. पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी आणि अपारशक्ती खुराना हे देखील या चित्रपटात आहेत.
तसेच या चित्रपटात अक्षय कुमार, वरुण धवन आणि तमन्ना भाटिया हे तीन कॅमिओ देखील आहेत.
2018 मधील स्त्री या चित्रपटाचे भारतातील एकूण कलेक्शन 414.8 कोटी रुपये आहे. तर स्त्री 2 ने 13 दिवसांत जगभरातून 592 कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाचे विदेशी कलेक्शन 96.25 कोटी असून भारतात याची एकूण उलाढाल 495 कोटी रुपये आहे.
चित्रपटाचा हा प्रवास 51.8 कोटी रुपयांपासून सुरू झाला असून पिक्चरने पहिल्याच दिवशी इतक्या कोटींची कमाई केली होती. तर 13व्या दिवशी 11.75 कोटी रुपयांचा व्यवसाय झाला आहे. या चित्रपटाचे बजेट 50 कोटी आहे असे सांगण्यात आले होते.
या चित्रपटाने अनुक्रमे पहिल्या दिवशी 51.8 कोटी कमवले होते. दुसऱ्या दिवशीचे कलेक्शन 31.4 कोटी तर तिसऱ्या दिवशी 43.85 कोटींचा व्यवसाय या चित्रपटाने केला. चौथ्या दिवशी 55.9 कोटींची कमाई या चित्रपटाने केली. पाचव्या दिवशी या चित्रपटाने 200 कोटींची कमाई केली आहे.
सहाव्या दिवशी 25.8 कोटींचा व्यवसाय स्त्री 2 ने केला आहे. . सातव्या दिवशी 400 कोटी रुपये, आठव्या दिवशी 16.8 कोटी, नवव्या दिवशी 17.5 कोटी, दहाव्या दिवशी 33 कोटी, तर अकराव्या दिवशी 42.4 कोटीची कमाई या चित्रपटाने केली आहे.