पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेल्या प्रक्षोभक विधानाच्या विरोधात दिल्लीत तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी एका वकिलाने दिलेल्या तक्रारीवर हा गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येच्या विरोधात बुधवारी 28 ऑगस्ट रोजी भाजपने बंगाल बंद पुकारला होता. यादरम्यान अनेक ठिकाणांहून हिंसाचाराच्या बातम्या आल्या, त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंगाल जळला तर आसाम, बिहार, झारखंड, ओडिशा आणि दिल्लीही जळतील, असे प्रक्षोभक विधान केले होते. ममतांच्या या आक्षेपार्ह विधानावरून राजकारण पेटले असून आले असतानाच दिल्लीतील वकील विनीत जिंदाल यांच्या फिर्यादीवरून ममता बॅनर्जींच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
यासंदर्भात तक्रारदार ऍड. विनीत जिंदाल म्हणाले की, ममता यांचे विधान प्रक्षोभक होते, ज्यामुळे द्वेष आणि शत्रुत्व निर्माण होईल. त्यांचे विधान सामाजिक सलोखा आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण करणारे होते. कारण त्या मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या शब्दांचा प्रभाव आहे, जो धोकादायक सिद्ध होऊ शकतो. ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या वक्तव्यात दिल्लीचे नाव घेतले होते. दिल्लीचा रहिवासी असल्याने मी बंगालच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध भादंविचे कलम 152, 192, 196 आणि 353 अंतर्गत तक्रार दाखल केली आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या बंगाल बंदचा निषेध केला आणि हा राज्याला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात अशांतता निर्माण करण्यासाठी पक्षाचा (भाजप) वापर केल्याचा आरोपही त्यांनी केला. शेजारील देशातील विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील बंडखोरीचा संदर्भ देत मुख्यमंत्री ममता म्हणाल्या होत्या, “काही लोकांना वाटते की हे (उठाव) बांगलादेशात होत असलेल्या निदर्शनांसारखे आहे. ते आमचे (बंगाल) आहेत, आमची संस्कृतीही सारखीच आहे. पण तरीही बांगलादेश हा वेगळा देश आहे.