Maharashtra Assembly Elections : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. शुक्रवारी देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. ते लवकरच बाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.
जितेश अंतापूरकर हे भाजप नेते अशोक चव्हाण यांच्या जवळचे मानले जातात, अशा स्थितीत ते त्यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून जितेश अंतापूरकर आणि काँग्रेसचे अन्य काही आमदार पक्ष नेतृत्वाच्या रडारवर असल्याची चर्चा होती. विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यात अंतापूरकर यांच्या नावाचाही समावेश होता. तर दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तिकीट न दिल्याच्या भीतीने अंतापूरकरांनी हे पाऊल पाऊस उचलल्याचे म्हंटले जात आहे.
क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांमध्ये अंतापूरकर यांचा समावेश असल्याचा संशय काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केल्याने आगामी निवडणुकीत त्यांना तिकीट न देण्याचा निर्णय पक्षनेतृत्वाने घेतला होता. यानंतर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
कोण आहेत जितेश अंतापूरकर ?
देगलूरचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे जितेश अंतापूरकर हे चिरंजीव आहेत. रावसाहेब अंतापूरकर यांचे 2022 साली कोरोनामध्ये निधन झाले त्यावेळी पोटनिवडणुकीत काँग्रेसने जितेश अंतापूरकर यांना मैदानात उतरवले. तर भाजपने शिवसेचे सुभाष साबणे यांचा भाजप प्रवेश करून त्यांना उमेदवारी दिली. त्या पोटनिवडणूकित अंतापूरकर हे 40 हजाराचा मतांनी विजयी झाले होते. अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केल्यानंतर अंतापूरकर हे चव्हाण सोबत दिसू लागले. आता झालेल्या निवडणुकीत सुद्धा अंतापूरकर हे फार सक्रिय नव्हते. त्या संदर्भात सुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तक्रार देखील केली होती.