Eknath Shinde : सिंधुदुर्गमधील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली. या घटनेवरून विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. तसेच राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे.
राज्यभरातून या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत, अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोशल मीडिया हँडल X वर पोस्ट शेअर करत माफी मागितली आहे, यावेळी त्यांनी ‘महाराजांचा सच्चा मावळा’..!! म्हणत शपत घेतली आहे.
अजित पवार यांनी X वर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘महाराजांचा सच्चा मावळा’..!! राजं माफी असावी. झालेल्या घटनेनं सुन्न झालो. तुम्ही आमचं दैवत आहात. तुमच्या नावाला साजेसं स्मारक पुन्हा उभारु!! असं म्हणत त्यांनी महाराजांची माफी मागितली आहे.
'महाराजांचा सच्चा मावळा'..!!@AjitPawarSpeaks pic.twitter.com/4WyCFyV06d
— MahaNCPspeaks (@mahancpspeaks) August 30, 2024
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधण्यात आला होता. या पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. परंतु मंगळवारी हा पुतळा कोसळला आहे. अवघ्या आठ महिन्यातच हा पुतळा कोसळल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले. यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करत अनेक ठकाणी आंदोलन केली. तसेच या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील लोकांच्या तीव्र भावना लक्षात घेवून, जाहीर माफी मागितली आहे.