Donald Trump Controversy : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “हॅरिस यांनी राजकारणातील कारकीर्द पुढे नेण्यासाठी शारीरिक संबंध बनवले आहेत.
“खरं तर, 1990 च्या दशकात, हॅरिस यांनी तिच्यापेक्षा 30 वर्षांनी मोठे असलेल्या सॅन फ्रान्सिस्कोचे माजी महापौर विली ब्राउन यांच्याशी नातेसंबंध ठेवले होते. त्यानंतर ते कॅलिफोर्निया राज्य विधानसभेचे अध्यक्षही होते. विली ब्राउनसोबतच्या संबंधांमुळे हॅरिसला राजकारणात पुढे जाण्यास मदत झाल्याचा आरोप ट्रम्प यांनी पोस्टद्वारे केला आहे. ट्रम्प यांच्या कंमेंट्समुळे सध्या राजकारण चांगलेच तापले आहे.
हिलरी क्लिंटन यांच्यावरही आक्षेपार्ह टिप्पणी
ट्रम्प यांनी त्यांच्या एका समर्थकाची पोस्ट पुन्हा शेअर केली. त्यात हॅरिस आणि हिलरी क्लिंटन एकत्र दिसत असलेल्या फोटोचाही समावेश आहे. याद्वारे ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांच्यावरही भाष्य केले. खरं तर, हिलरी यांचे पती आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यावर 1995 मध्ये व्हाईट हाऊसमधील इंटर्न मोनिका लेविन्स्कीसोबत शारीरिक संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता.
दोघांचे नाते 18 महिने टिकले. 26 जानेवारी 1998 रोजी एका दूरचित्रवाणी संबोधनात क्लिंटन म्हणाले की, त्यांचे लेविन्स्कीसोबत कोणतेही अफेअर नाही. या वादामुळे क्लिंटन यांच्याविरोधात हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये महाभियोग प्रस्तावही आणण्यात आला होता. 2000 च्या अध्यक्षीय निवडणुकीत या दाव्याचा फटका डेमोक्रॅटिक पक्षाला सहन करावा लागला होता.
गेल्या 10 दिवसांत ट्रम्प यांनी कमला हॅरिसवर कोणतीही आक्षेपार्ह टिप्पणी करण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी 18 ऑगस्ट रोजी ट्रम्प यांनी हॅरिस आणि विली ब्राउन यांच्या नात्याबाबत एक पोस्टही टाकली होती.
तसेच यापूर्वी ट्रम्प यांनी कमला हॅरिसच्या यांच्या वांशिक अस्मितेवरही प्रश्न उपस्थित केले होते. ट्रम्प यांनी एका मुलाखतीत विचारले होते की कमला हॅरिस भारतीय आहेत की कृष्णवर्णीय? कमला हॅरिस नेहमीच स्वत:ला भारतीय वारसा म्हणून सांगतात, पण काही वर्षांपूर्वी अचानक त्या कृष्णवर्णीय झाल्या.
कमला कृष्णवर्णीय आहे हे मला अनेक वर्षांपासून माहीत नव्हते, त्या भारतीय वंशाच्या आहेत, असे त्यांना वाटत राहिल्याचे ट्रम्प म्हणाले. आता काही वर्षांपासून कमला स्वतःला कृष्णवर्णीय म्हणू लागल्या आहेत. कमला यांना कृष्णवर्णीय महिला म्हणून जगात ओळख निर्माण करण्याची आहे तसेच त्यांना मत मिळवायची आहेत, असे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष म्हणाले होते.