Vadhvan Port : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी महाराष्ट्र दौऱ्यावर होते. आज त्यांच्या हस्ते मुंबईत 76000 कोटी रुपयांच्या वाधवन प्रकल्पाचे भूमी पूजन झाले. हा प्रकल्प भारतात होत असलेल्या विकासाचा पुरावा असल्याचे त्यांनी यावेळी म्हंटले आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सागरी जहाजांची वाहतूक सुलभ होणार असल्याचे देखील त्यांनी म्हंटले आहे.
तसेच बंदराच्या निर्मितीनंतर भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार वाढेल आणि आर्थिक विकासालाही चालना मिळेल. असेही म्हंटले आहे. हा प्रकल्प पालघर जिल्ह्यातील डहाणू परिसरात उभारण्यात येणार आहे. नेमका वाधवन बंदर प्रकल्प काय आहे आणि कसा फायदेशीर ठरेल? जाणून घेऊया…
कोट्यवधींचा प्रकल्प
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील डहाणू शहराजवळ वाधवन बंदर बांधले जाणार आहे. हे भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्याच्या बंदरांपैकी एक आहे. या बंदराच्या उभारणीमुळे देशाचा सागरी संपर्क वाढणार आहे. पंतप्रधानांनी आज या प्रकल्पाचे भूमिपूजन केले.
आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय शिपिंग मार्गांशी थेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे. देशातील जागतिक दर्जाच्या व्यापारासाठी आंतरराष्ट्रीय सागरी मार्ग खुले करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर भारत अनेक देशांशी सागरी मार्गाने व्यापार वाढवेल.
वेळेची बचत
मुंबईजवळ बंदर बांधल्याने मालवाहतुकीचा वेळ वाचेल आणि कमी अंतर कापल्यामुळे आयातीचा खर्चही कमी होईल. आधुनिक तंत्रज्ञान आणि परिसरातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन हे बंदर बांधण्यात आले आहे. आतापर्यंत मुंबई भोवती बंदरे नसल्यामुळे सागरी मार्गाने मालवाहतूक करणे आणि नेण्यात अडचणी येत होत्या.