सध्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहेत. सर्व पक्षातील वरिष्ठ नेते देखील आगामी निवडणुकांसाठी कामाला लागले आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी 4 सप्टेंबरला काश्मीरमध्ये प्रचार करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
विधानसभेची निवडणूक जम्मू-काश्मीरमध्ये 18, 25 आणि 1 ऑक्टोबरला होणार आहे. निवडणुकीच्या विजयासाठी सर्वच पक्ष तयारी करत आहेत. जम्मू काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीसाठी दोन पक्षांमध्ये जागावाटप देखील झाले आहे. या जागा वाटपानुसार ९० पैकी काँग्रेस 32 जागा लढवणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये एकूण 90 विधानसभा मतदारसंघ आहेत यापैकी सात जागा SC आणि नऊ जागा ST साठी राखीव आहेत.
काँग्रेसने 27 ऑगस्ट रोजी आगामी विधानसभा निवडणुकी करिता नव उमेदवारांची यादी जाहीर केली होती. AICC चे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी स्वाक्षरी केलेल्या दस्तऐवजात ही यादी जाहीर करण्यात आली होती. आगामी विधानसभा निवडणुकींकरिता समाजवादी पक्षाने जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीत काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स आघाडीला पाठिंबा दिला आहे.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेस प्रमुख नेते गुलाम अहमद मीर डोरूमधून आणि विकार रसूल वानी बनिहालमधून निवडणूक लढवणार आहेत. पीरजादा मोहम्मद सय्यद हे अनंतनाग मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत, तर शेख रियाझ डोडा मतदारसंघासाठी इच्छुक आहेत.
याचसोबत काँग्रेस पक्षाने त्रालमधून सुरिंदर सिंग चन्नी, देवसरमधून अमानुल्लाह मंटू, इंदरवालमधून शेख जफरुल्ला, भद्रेवाहमधून नदीम शरीफ आणि दोडा पश्चिममधून प्रदीप कुमार भगत यांना उमेदवारी दिली आहे.
दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील डोरू येथून विधानसभा निवडणूक लढवत असलेले मीर म्हणाले की, गांधी डोरू स्टेडियमवर निवडणूक रॅलीला संबोधित करतील. ते म्हणाले की, गांधी कदाचित जम्मूच्या सांगलदान भागात आणखी एका सभेला संबोधित करतील. मीर म्हणाले की, राहुल गांधींनी आमचे निमंत्रण स्वीकारले याचा आम्हाला आनंद आहे. हा कार्यक्रम फक्त पहिल्या टप्प्यासाठी आहे. ते इतर टप्प्यांसाठी पुन्हा जम्मू-काश्मीरला भेट देऊ शकतात.