पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्स दरम्यान तीन वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. मेरठ – लखनौ, मदुराई – बेंगळुरू आणि चेन्नई – नागरकोइल. या तीन मार्गावर चालणाऱ्या ट्रेनला पंतप्रधानांनी झेंडा दाखवला आहे. वंदे भारत गाड्यांचा विस्तार आधुनिकता,गती आणि विकसित भारत या ध्येयाकडे देशाची वाटचाल दाखवत आहे असे यावेळी पंतप्रधान म्हणाले आहेत.
यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले आहेत की, आज उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, देशाच्या विकासाच्या प्रवासात आणखी एक भर पडत आहे. या ट्रेन्सने देशातील महत्वाच्या धार्मिक स्थळ जोडली गेली आहेत.
याचसोबत पुढे बोलताना ते म्हणाले आहेत की, जिथे जिथे वंदे भारतची सुविधा पोहोचली आहे तिथे पर्यटकांची संख्या वाढली आहे, याचा अर्थ व्यवसाय आणि दुकानदारांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. चेन्नई-नागरकोइल मार्गावर, विद्यार्थी, शेतकरी आणि आयटी व्यावसायिकांना खूप फायदा होईल . या प्रदेशात रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होत आहेत.
अर्थसंकल्पा विषयी बोलताना, या वर्षीच्या अर्थसंकल्पात, आम्ही तामिळनाडूच्या रेल्वे अर्थसंकल्पासाठी 6,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त तरतूद केली आहे. हा अर्थसंकल्प 2014 च्या तुलनेत सात पटीने जास्त आहे. तामिळनाडूमध्ये सहा वंदे भारत गाड्या सुरू आहेत आणि आज ही संख्या आठपर्यंत पोहोचेल असे भाष्य देखील नरेंद्र मोदींनी यावेळी केले आहे.
दरम्यान, मेरठ शहर – लखनऊ यामधील 2 तासांचे अंतर कमी करण्याचे काम वंदे भारत करेल. याचप्रमाणे, चेन्नई एग्मोर – नागरकोइल वंदे भारत आणि मदुराई – बेंगळुरू वंदे भारत या गाड्या अनुक्रमे 2 तास आणि सुमारे 1 तास 30 मिनिटांपेक्षा जास्त प्रवाशांच्या वेळेची बचत करणार आहेत.