तुंबाड हा भयपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. सप्टेंबर 2024 मध्ये पुन्हा एकदा तो सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट पुन्हा री रिलीज होणार असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रेक्षकांना ‘तुंबाड’च्या भयानक जगाचा पुन्हा अनुभव घेता येणार आहे. हा एक काल्पनिक, हॉरर चित्रपट आहे यामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून पसंती मिळत आहे.
चित्रपट निर्मात्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर या चित्रपटाचा पोस्टर पोस्ट केला आहे यामुळे हा चित्रपट किती हॉरर असेल याची कल्पना प्रेक्षकांना आली आहे. पोस्टरमध्ये नायक विनायक राव त्याच्या लहान मुलासह हातात दिवा न घेत, भयानक रात्रीत पुढे जाताना दाखवले आहेत. पोस्टरवर निर्मात्याने “सिनेमाघरात 13 सप्टेंबर 2024 रोजी अनुभव घ्या” असे टॅगलाइन दिले आहे.या सिनेमामध्ये विनायक राव यांची कथा लोभ आणि ध्यास याच्या दिशेने जाताना दिसते. कारण ते हस्तर नावाच्या दुष्ट प्राण्याने संरक्षित केलेल्या पौराणिक खजिन्याचा शोध घेत असतात.
तुंबाड साठी मितेश शाह, प्रसाद, बर्वे आणि गांधी यांनी कथा लिहिली असून आणि सोहम शाह, आनंद एल राय, मुकेश शाह आणि अमिता शाह यांनी फिल्म प्रोड्यूस केली आहे. या सिनेमाला उत्कृष्ठ कथा, प्रभावशाली सिनेमेटोग्राफीसाठी आणि प्रोडक्शनसाठी खूप प्रशंसा मिळाली आहे.
राही बर्वे दिग्दर्शित तुंबाडला 64 व्या फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये आठ नॉमिनेशन्स मिळाली होती, ज्यात बेस्ट सिनेमेटोग्राफी, बेस्ट आर्ट डायरेक्शन आणि बेस्ट साउंड डिझाइनसाठी तीन पुरस्कार मिळाले. 75 व्या वेनिस इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या क्रिटिक्स वीक सेक्शनमध्ये दाखवली गेलेली तुंबाड ही पहिली भारतीय फिल्म होती. या फिल्ममध्ये सोहम शाह, ज्योती मालशे आणि अनीता दाते-केळकर यांनी भूमिका साकारल्या होत्या.
दरम्यान, हा चित्रपट 2024 मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघता येणार नाही. त्यामुळे हा चित्रपट सिनेमागृहात पाहण्याची उत्तम संधी 13 सप्टेंबर 2024 पासून मिळणार आहे.