काही दिवसांपूर्वी सरकारकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा पहिला हप्ता अनेक महिलांच्या खात्यात जमा देखील झाला आहे. आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर असतानाच सरकारकडून या योजनेचा प्रचार करण्यात येत आहे. याच योजनेचा नागपूर मध्ये कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार देखील उपस्थित होते.
या कार्यक्रमात बोलताना, गुलाबी रिक्षा योजना, शुभमंगल योजना, लेक लाडकी योजना, शेतकऱ्यांसाठी एक रुपयांमध्ये पिक विम्याची योजना सरकारने सुरू केली.योजनांवर पैसा जास्त खर्च होत आहे त्यामुळे त्या बंद करा असे विरोधकांनी सांगत हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली. परंतु राखीची आम्हाला आण आहे, काही झालं तरी आम्ही या योजना थांबवणार नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
विरोधकांनी पहिल्यांदा मुंबईच्या न्यायालयात याचिका दाखल केली यानंतर नागपूरच्या न्यायालयात याचिका दाखल केली बहिणींना पैसे मिळू लागले की यांच्या पोटात दुखू लागले परंतु योजनांच्या माध्यमातून आम्ही परिवर्तन करणार आहोत असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखपती दीदी ही योजना सुरू केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार आहेत. पहिल्या टप्प्यात 25 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील महिला नोकरी मागणाऱ्या नाहीत तर नोकरी देणाऱ्या महिला असणार आहेत असे भाष्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
दरम्यान, कोणी कितीही प्रयत्न केले तरी या योजना स्थगित होणार नाहीत असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले आहे.