IndiGo Bomb Threat : मध्य प्रदेशातील जबलपूरहून हैदराबादला जाणारे इंडिगो विमान रविवारी बॉम्बच्या धमकीनंतर नागपूरच्या दिशेने वळवण्यात आले. इंडिगोने एका निवेदनात म्हटले आहे की, विमानात बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर जबलपूरहून हैदराबादला जाणाऱ्या फ्लाईचे नागपूर विमानतळावर आप्तकालीन लँडींग करण्यात आले नागपूर विमानतळावर लँडिंग केल्यानंतर सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले आणि ताबडतोब अनिवार्य सुरक्षा तपासणी सुरू करण्यात आली.”
एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, विमानाच्या बाथरूममध्ये एक कागद सापडला होता, ज्यावर विमानात बॉम्ब असल्याचे लिहिले होते. मात्र, विमानाच्या लँडिंगनंतर विमानाची तपासणी केल्यानंतर त्यात काहीही संशयास्पद आढळले नाही. त्यानंतर विमान दुपारी दोन वाजता हैदराबादकडे रवाना करण्यात आले.
Flight 6E 7308 operating from Jabalpur to Hyderabad was diverted to Nagpur due to a bomb threat. Upon landing, all passengers were disembarked and mandatory security checks were promptly initiated…" IndiGo pic.twitter.com/X8VUnGV6dZ
— ANI (@ANI) September 1, 2024
बॉम्बच्या खोट्या धमक्यांमध्ये वाढ
अलीकडच्या काळात विमानतळ आणि रुग्णालयांमध्ये बॉम्बच्या खोट्या धमक्या मिळण्याच्या घटना वाढल्या आहेत. 18 जून रोजी जयपूर, चेन्नई आणि वाराणसीसह 41 विमानतळांना ईमेलवर बॉम्बची धमकी मिळाली होती. यावेळी देखील बराच वेळ तपास सुरू राहीला. मात्र, या धमक्या फसव्या असल्याचे लक्षात आले.
यापूर्वी 22 ऑगस्ट रोजी मुंबईहून येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्बची धमकी दिल्यानंतर तिरुअनंतपुरम विमानतळावर संपूर्ण आणीबाणी घोषित करण्यात आली होती.