महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी पुणे महानगरपालिकेचे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची काल रविवारी (1 सप्टेंबर) रोजी रात्री काही अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली.शहरातील नाना पेठ परिसरात ही घटना घडली आहे.
राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या निधनाबाबत पुण्याचे सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा म्हणाले, “काल रात्री साडेनऊच्या सुमारास वनराज आंदेकर (अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाचे माजी नगरसेवक) त्यांच्या चुलत भावासह इमानदार चौकात उभे होते. त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले असून, वनराज आंदेकर यांना शोधून त्यांना अटक करण्यात यश आले आहे “हल्लेखोरांनी आधी वनराज यांच्यावर पिस्तुलाने गोळ्या झाडल्या त्यानंतर धारदार शस्त्राने हल्ला केला. वनराज आंदेकर हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असताना हल्लेखोर तेथून पळून गेले.
सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा म्हणाले, ‘वनराज आंदेकर यांच्यावर पाच गोळ्या झाडण्यात आल्या. तसेच त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले. त्यांना मृत अवस्थेत किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटलमध्ये (केईएम) नेण्यात आले होते. वनराज आंदेकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणी अद्याप कोणाच्या अटकेची माहिती नाही. मात्र पुणे पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक खून प्रकरणात तीन जणांना ताब्यात घेतले आहे.वनराज आंदेकर यांच्या हल्ला करणाऱ्या संशयित आरोपींची नावे समोर आली आहेत. गणेश कोमकर, सोमनाथ सयाजी गायकवाड आणि तुषार आबा कदम अशी या तिघांची नावे आहेत. गणेश कोमकर हा कुख्यात गुंड बंडू उर्फ सुर्यकांत आंदेकर याचा जावई असल्याची माहिती समोर येत आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आंदेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित होते.तसेच गँगस्टर बंडू आंदेकर हे त्यांचे वडील होत.घरगुती वादातून घडलेल्या या खुनाच्या घटनेला बंडू आंदेकर यांचा जावई गणेश कोमकर जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे. कौटुंबिक वाद आणि पैशाच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तिघांची चौकशी सुरू आहे.