आपल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकणारी अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत. अनेक कलाकारांविषयी देखील तिने वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. राजकीय नेत्यांपासून ते शेतकरी आंदोलनापर्यंत तिने वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. त्यामुळे लोकांकडून तिच्यावर टीका देखील करण्यात येत आहे.
कंगना रणौत पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांच्यावर केलेल्या टीकेमुळे. नुकत्याच झालेल्या संसदीय अधिवेशनात जया बच्चन यांनी त्यांचे नाव जया अमिताभ बच्चन असे घेतल्यामुळे चिडून अनेक वक्तव्य केली होती. त्यानंतर त्यांनी आपल्याला अभिमान आहे असे देखील सांगितले होते.
या घटनेवरूनच कंगना रणौतने जया बच्चन यांच्यावर आपल्या मुलाखती मध्ये जोरदार हल्लाबोल केला आहे. ही अत्यंत लाजिरवाणी बाब असून निसर्गाने स्त्री पुरुष वेगवेगळे निर्माण केले आहेत. स्त्रीवादाच्या नावाखाली अनेक स्त्रिया चुकीच्या मार्गाने जात आहेत असे आज या घटनांवरून दिसत आहे. समाज अहंकाराकडे वाटचाल करत आहे. पतीचे नाव आपल्या नावापुढे जोडले गेल्या काही स्त्रियाना ओळख कुठेतरी हरवल्याचे वाटते. जया बच्चन यांना कधी कधी पॅनिक अटॅक येतो. अशा प्रकारचे वक्तव्य देखील कंगना रणौत हिने केले आहे.
यापूर्वी कंगना रणौत शेतकरी आंदोलनावर बोलताना, शेतकरी आंदोलनात मोठा हिंसाचार झाला. त्याठिकाणी बलात्कार झाले आहेत. अनेकांच्या हत्यादेखील झाल्या आहेत अशी वादग्रस्त वक्तव्य केली होती. कृषी क्षेत्रातून देखील कंगनावर या विधानांमुळे जोरदार टीका करण्यात आली होती.