Eknath Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मोठी बातमी समोर येत आहे, त्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. आज सकाळी एकनाथ शिंदे हे भिमाशंकर येथे दर्शनसाठी जात होते त्यावेळी त्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले, नेमके कोणत्या कारणामुळे हे घडले जाणून घेऊया…
म्हणून हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले…
एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग पुण्यातील लांडेवाडी परिसरात करण्यात आले. आज सकाळी ते भिमाशंकर येथे दर्शनसाठी जात होते. मात्र, खराब हवामानाचा फटका त्यांच्या दौऱ्याला बसला आहे. खराब हवामानामुळे त्यांना आपल्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले.
श्रावण महिन्यातील आज शेवटच्या सोमवारी मुख्यमंत्री श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे सहकुटुंब दर्शनासाठी जात होते. मात्र, सकाळपासून येथील हवामान खराब आहे, या परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये धुके पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडीत उतरवण्यात आले.