सध्या कलर्स मराठी’ वाहिनीच्या बिग बॉस मराठी 5 ल प्रेक्षकांकडून “शो “ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु सध्या झालेल्या भाऊच्या धक्का या एपिसोडवर प्रेक्षक नाराज झाले आहेत. या कार्यक्रमाचे होस्ट रितेश देशमुख हे नेहमीच निक्की तांबोळीची बाजू घेत असतात असे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. यामुळे प्रेक्षक सध्या नाराज झाले आहेत.
यापुढे हा शो बघणार नाही, असे म्हणत प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. बिग बॉसच्या घरातील इतर सदस्यांना रितेश देशमुख त्यांच्या वागण्यावरून, बोलण्यावरून ओरडत असतो परंतु निक्की तांबोळीला तो ओरडत नाही असे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. यामुळेच प्रेक्षकांकडून आता संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
भाऊचा धक्का’ एपिसोडचा प्रोमो कलर्स मराठी’ वाहिनीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या पोस्टच्या खाली प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की ‘लोकांच्या नजरेत निक्कीची प्रतिमा चांगली बनवण्यासाठी बिग बॉस खूप मनापासून प्रयत्न करत आहे.’
दुसऱ्या एका युजरने प्रतिक्रिया देताना, ‘आम्हाला वाटतं भाऊचा धक्का म्हणजे आज जे चुकीचे वागलेत त्यांची शाळा घेणार. पण आज समजलं की निक्कीचं सगळं बरोबर असतं आणि बाकीच्यांचं चुकीच दाखवायचं. यासाठीच भाऊचा धक्का असतो,’ असे म्हटले आहे.
‘शो नुकताच पाहणं चालू केलं होतं, कालपासून बंद केला आहे,’ अशी एका युजरने कमेंट केली आहे. निक्कीसाठी बिग बॉस बनवलाय का’, असा प्रश्न देखील एका युजरने उपस्थित केला आहे.