Amanatullah Khan Arrest : आम आदमी पार्टीचे नेते आणि आमदार अमानतुल्ला खान यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली आहे. सोमवारी आप आमदाराने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अटक होण्याची भीती व्यक्त केली होती. 4 तासांच्या छाप्या आणि चौकशीनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली आहे. त्यांना दिल्ली वक्फ बोर्डाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
ईडीच्या पथकाने अमानतुल्ला यांना अटक केली तेव्हा त्यांच्या घराबाहेर समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आल्याचे आम आदमी पक्षाने म्हटले आहे.
#WATCH | Delhi: AAP MLA Amanatullah Khan detained by ED officials.
ED had arrived at his residence to conduct a raid, earlier today. pic.twitter.com/lUCufRTGFh
— ANI (@ANI) September 2, 2024
काय आहे दिल्ली वक्फ बोर्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरण?
आपचे आमदार अमानतुल्ला खान यांच्यावर दिल्ली वक्फ बोर्डात ३२ जणांची बेकायदेशीरपणे भरती केल्याचा आरोप आहे. त्यांनी निधीचा गैरवापर केला आहे. याप्रकरणी मनी लाँड्रिंगचा तपास सुरू आहे. सीबीआयने या प्रकरणी एफआयआर दाखल केला असून दिल्ली पोलिसांकडे तीन तक्रारीही दाखल केल्या आहेत. ईडी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा तपास करत आहे.
दिल्ली वक्फ बोर्डाच्या तत्कालीन सीईओंनी अशा बेकायदेशीर भरतीविरोधात निवेदन जारी केले होते. तपासादरम्यान अमानतुल्लाच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणांहून रोख रक्कम जप्त करण्यात आली. या संदर्भात अमानतुल्ला यांची अनेकदा चौकशी करण्यात आली आहे. यासोबतच वक्फ बोर्डाच्या मालमत्ता बेकायदेशीरपणे भाड्याने दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तर आम आदमी पक्षाने ही अटक राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले आहे.
लाल डायरीचे सत्य?
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (ACB) कौशर इमाम सिद्दीकी यांच्या घरातून अमानतुल्ला खान यांच्यावरील आरोप आणि दिल्ली वक्फ बोर्डातील मनी लाँड्रिंग या प्रकरणाशी संबंधित एक व्यक्ती लाल डायरी मिळाली होती. ही व्यक्ती अमानतुल्ला खान यांच्या जवळची असल्याचे सांगितले जाते. अँटी करप्शन ब्युरोच्या म्हणण्यानुसार, अमानतुल्लाशी संबंधित कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांच्या नोंदीही या लाल रंगाच्या डायरीत लिहिण्यात आल्या होत्या.