मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा काही दिवसांपूर्वीच करण्यात आली होती. या योजनेमार्फत अनेक महिलांना आर्थिक मदत होणार आहे. या योजनेसाठी महिलांनी अर्ज केले होते यामधून अनेक महिलांच्या खात्यावर या योजनेतील पहिला हप्त्याचे पैसे देखील आले आहेत. आतापर्यंत 2 कोटी 40 लाख महिलांनी अर्ज केले आहेत.
राज्यातील अनेक महिला मात्र अजून देखील अर्ज करत आहेत. अनेक महिलांचे अर्ज अजूनही भरले गेलेले नाहीत. याच पार्श्वभूमीवर सरकारकडून अर्ज भरण्याची मुदत वाढ होऊ शकते. अर्जाची शेवटची दिनांक सरकारकडून वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि याचाच फायदा अनेक महिलांना होणार आहे.
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 31 ऑगस्ट होता. परंतु अजून देखील काही महिला अर्ज करत आहेत. महिलांना अर्ज भरताना तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे त्यांचे अर्ज भरायचे राहून गेले. तांत्रिक अडचणीमुळे अनेक वेळा प्रयत्न करून देखील त्यांचे अर्ज भरले गेले नाहीत. त्यामुळेच राहिलेल्या महिलांना अर्ज भरता यावा यामुळे सरकारकडून अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात येईल असे सांगण्यात येत होते.
लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर सुरूवातीला सरकारने 31 जुलैची मुदत दिली होती. मात्र महिलांची कागदपत्रांसाठीची जमवाजमव आणि सरकारी कार्यालयातील गर्दी पाहता सरकारने योजनेच अर्ज करण्याची मूदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवली होती. आता ही मुदत देखील संपली होती. मात्र सरकारकडून आता ह्या सप्टेंबर महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.
दरम्यान, या योजनेचा पहिला हप्ता दीड कोटी महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण 3000 रुपये जमा झाले आहेत. पण अनेक महिलांना पैसे मिळालेले नाहीत कारण त्यांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नाही. यामुळेच बँक सिडिंगची प्रक्रिया देखील राबवली जात आहे.
आधार आणि बँक खाते एकमेकांशी लिंक झाले की उरलेल्या सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे यामुळे सर्व पात्र महिलांना आर्थिक मदत देखील होणार आहे.