Sonam Wangchuk : लडाखच्या पर्यावरण संदर्भात काम करणारे तसेच शास्त्रज्ञ आणि समाज सेवक सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली 100 हून अधिक स्वयंसेवकांनी रविवारी लेह ते राजधानी दिल्लीपर्यंत पायी मोर्चा काढला आहे. हा मोर्चा केंद्राकडून थांबलेल्या मागण्यांसाठीची चर्चा पुन्हा सुरू करण्यासाठी काढण्यात येत आहे. काय आहेत मागण्या? पाहूया…
कोणत्या मागण्यांसाठी काढण्यात येत आहे मोर्चा?
१. लडाखला राज्याचा दर्जा मिळावा.
२. लडाखचा सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करावा.
३. लेह आणि कारगिल जिल्ह्यांसाठी स्वतंत्र लोकसभेच्या जागांची मागणी.
४. लडाखमध्ये स्थानिक लोकांसाठी विशेष जमीन आणि नोकरीच्या हक्कांची मागणी.
५. लोकसेवा आयोग स्थापन करण्याची मागणी.
या मोर्चात मोठ्या प्रमाणात महिलांचा समावेश दिसत आहे, ज्यामुळे सर्व देशांचे लक्ष वेधून घेतले आहे. महिलांसह जेष्ट नागरिक आणि तरुण देखील मोठ्या प्रमाणात या मोर्चात सहभागी झाले आहेत. रविवारी सुरु कलेला हा मोर्चा २ ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी दिल्लीत पोहचेल.
याआधी सोनम वांगचुक यांनी लडाखला राज्याचा दर्जा मिळावा आणि लडाखचा संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्यात यावा यासाठी तब्बल २१ दिवसांचे उपोषण केले होते.