ई फॉर एकनाथ सोबत मदतीला डी आणि ए त्यामूळे मला चिंता करायची गरज नाही अशा मिश्किल शब्दात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोलेबाजी केली आहे .२७ व्या आंतरराष्ट्रीय ई – गव्हर्नन्स परिषदेचे उद्घाटन आज मुंबईत मुख्यमंत्र्यांनी केले त्यावेळी ते संबोधित करत होते.
ते पुढें म्हणाले की ई – गव्हर्नन्स हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. आजच्या घडीला ई – गव्हर्नन्स मुळे आम्ही एका झटक्यात लाखो महिलांच्या खात्यात प्रत्येकी १५०० रुपये एका झटक्यात टाकू शकलो. यापुढील काळात आम्ही एआय चा देखील विचार करू कारण तंत्रज्ञान बदलते आहे तसे शासन – प्रशासन देखील बदलले पाहिजे. तंत्रज्ञानाचा वापर करून शासनात सुशासन आणायचा आमचा प्रयत्न राहील.
या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री शिंदेनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबद्दल आम्ही उद्या बैठक बोलवलेली असल्याचे त्यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे म्हणाले की, “एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबद्दल आम्ही उद्या बैठक बोलवलेली आहे. यापूर्वीही एक बैठक पार पडली आहे. एसटी ही गावोगावी जाणारी आहे. त्यासाठी उद्या बैठक बोलवण्यात आलेली असून त्यात सकारात्मक चर्चा होईल. गणेशोत्सव जवळ आला आहे. अनेक नागरिक खरेदी विक्री करण्यासाठी बाजारपेठामध्ये जाण्यासाठी एसटीचा वापर करतात. त्यामुळे माझे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन आहे की तुम्ही संप करु नका. आपण याबद्दल सकारात्मक चर्चा करु आणि चर्चेतून तुमचा प्रश्न नक्की सुटेल”, असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत, .
आंतरराष्ट्रीय ई – गव्हर्नन्स परिषदेचे उद्घाटन समारंभाला आज मुख्यमंत्र्यासह राज्याचे उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,शिक्षणमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि देश – विदेशातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, येत्या ८ आणि ९ ऑगस्ट रोजी २७ वी ई – गव्हर्नन्स कॉन्फरन्स मुंबईत होते आहे.यंदा कॉन्फरन्सला महाराष्ट्र सरकारने आयोजित करण्याची जबाबदारी घेतली आहे. विकसित भारत,सुरक्षित आणि शाश्वत ई – सेवा हे या कार्यक्रमाचे घोषवाक्य आहे.