आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसून येत आहे. सर्व नेते एकमेकांवर टीका करत आहेत. राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे. .राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.
प्रलंबित महागाई भत्ता, वाढीव घरभाडे भत्ता आणि फरक,वेतनवाढीच्या दराचा फरक तसेच 4849 कोटी रुपयांमधील शिल्लक रकमेचे वाटप , मुळ वेतनात जाहीर केलेल्या पाच हजार, चार हजार आणि अडीच हजार रुपयांऐवजी सरसकट 5000 हजार रुपये मिळावेत अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. ही ,मागणी पूर्ण व्हावी यासाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे.
गुणरत्न सदावर्ते यांनी यावरूनच महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पिलावळांनी हा संप पुकारलाय असा आरोप त्यांनी केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना सातवा आयोग मविआ सरकारच्या काळातच मिळणार होता परंतु टक्केवारीवर नजर ठेवत एसटी कर्मचारी संघटनेने हा वेतन आयोग लागू होऊ दिला नाही असे वक्तव्य देखील त्यांनी यावेळी बोलताना केले आहे.
आम्ही 65 हजार कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करतो, आमदार पडळकर, पावसकर यांच्या संघटना या संपात उतरल्या नाहीत अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे.
गिरीश देशमुख नावाचे अधिकारी उद्धव ठाकरेंचे असून त्यांची चौकशी झाली पाहिजेत असे देखील ते म्हणाले आहेत. दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर देखील टीका केली आहे. सुप्रिया ताईंना महाराष्ट्रातील काहीच माहीत नसून त्यांच्या संघटनांनी कधीच महामंडळात व्यवस्थित नोकरी केली नाही त्यांना करार आणि टक्केवारी पाहिजेत यामुळेच कोणीही यांच्यावर विश्वास ठेवणार नाही असे वक्तव्य देखील त्यांनी यावेळी बोलताना केले आहे.