Chitra Wagh : मा.पवारसाहेब, बारामतीच्या मोठ्या ताई, ठाण्याचे हाड हाड आणि जंतराव…याचे उत्तर आहे का? ज्या वेळी शरदचंद्र पवार गटाचा आमदार चप्पल घालून छत्रपति शिवरांयाच्या अंगावर पाय देतो, त्यावेळी प्रतिक्रिया विचारली असता, सगळे जातीयवादी विषारी सांप बिळात जाऊन बसतात. तेव्हा महाराजांचा अपमान होत नाही का? मा. पवारसाहेब बारामतीच्या मोठ्या ताई, ठाण्याचे हाड हाड आणि जंतराव.. यावर उत्तर द्या? अशा तिखट शब्दात भाजपनेत्या चित्राताई वाघ यांनी नाव न घेता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड, खासदार सुप्रिया सुळे, यांच्यावर हल्ला चढवला आहे. चित्रा वाघ यांनी या संदर्भातला एक व्हिडिओ देखील आपल्या X अकाऊंटवर शेअर केला आहे.
मा. पवारसाहेब, बारामतीच्या मोठ्या ताई, ठाण्याचे हाड हाड आणि जंतराव.. याचे उत्तर आहे का?
ज्या वेळी शरदचंद्र पवार गटाचा आमदार चप्पल घालून छत्रपति शिवरांयाच्या अंगावर पाय देतो, त्या वेळी प्रतिक्रिया विचारली असता, सगळे जातीयवादी विषारी सांप बिळात जाऊन बसतात.
तेव्हा महाराजांचा… pic.twitter.com/YmGHvIm8l5
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 3, 2024
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये राजकोट किल्ल्याच्या परिसरात उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यांतच कोसळला. ही घटना सोमवारी 26 ऑगस्ट रोजी घडली. या घटनेवरून विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. तसेच राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे. विरोधक सातत्याने या घटनेवर भाष्य करत आहेत. तसेच सुप्रिया सुळे देखील ठिकठिकाणी आंदोलनं करत आहेत.
याच पार्श्ववभूमीवर रविवारी मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्यावतीने सरकारच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. हे आंदोलन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात पार पडलं.