सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन देशांच्या दौऱ्यावर आहेत. सध्या ते ब्रुनेई या देशात पोहचले असून त्या ठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ब्रुनेई दारुस्सलममध्ये क्राउन प्रिन्स, हाजी अल-मुहतादी बिल्लाह यांनी स्वागत केले आहे. भारतीय पंतप्रधानांनी ब्रुनेई देशाला दिलेली ही पहिलीच भेट आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी याबाबतची पोस्ट एक्सवर केली आहे.
एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये रणधीर जयस्वाल म्हणाले आहेत की, आपला देश या वर्षी भारत ब्रुनेई राजकीय संबंधांच्या स्थापनेची 40 वर्षे साजरी करत आहेत. आपल्या दौऱ्यावरील निवेदनात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत की, ऐतिहासिक द्विपक्षीय संबंधांना नवीन उंचीवर नेण्यासाठी ब्रुनेईचे शासक हाजी हसनल बोलकिया आणि राजघराण्यातील इतर सदस्यांसोबतच्या भेटींसाठी मी उत्सुक आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत एक्सवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये ते म्हणाले आहेत की, दोन्ही देशांच्या भेटीदरम्यान द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर त्यांचा जास्त भर असेल. ते ब्रुनेई सोबतच ते सिंगापूरला भेट देणार आहेत . या राष्ट्रांमधील विविध भेटींमधून त्यांच्याशी भारताचे संबंध अधिक दृढ करण्यावर जास्त भर आहे.
यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत की, मी महामहिम सुलतान हाजी हसनल बोलकिया यांची भेट घेण्यास अतिशय उत्सुक आहे. त्यानंतर सिंगापुरमध्ये राष्ट्रपती थर्मन शनमुगररत्नम तसेच पंतप्रधान लॉरेन्स वोंग, वरिष्ठ मंत्री ली सिएन लूंग आणि एमेरिटस वरिष्ठ मंत्री गोह चोक टोंग यांच्याशी चर्चा करणार आहे.दरम्यान, ब्रुनेईहून पंतप्रधान मोदी ४ सप्टेंबरला सिंगापूरला जाणार आहेत.