Netflix web series : नेटफ्लिक्सच्या IC814-द कंदहार हायजॅक या वेबसिरीजवर बंदी घालण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे. नुकतीच प्रदर्शित झालेली ही सिरीज चांगलीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या सिरीजमुळे जनभावना दुखावल्याचा दावा करत भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून नेटफ्लिक्स इंडियाच्या कंटेट हेडला समन्स देखील बजावण्यात आलं होतं. त्यानंतर आता नेटफ्लिक्सकडून महत्त्वाचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया…
खरं तर या वेब सीरिजमधील दोन दहशतवाद्यांच्या नावावर आक्षेप घेण्यात आला होता. यामध्ये दोन दहशतवाद्यांची नावे भोला आणि शंकर अशी ठेवण्यात आली होती. आणि त्यांची खरी ओळख लपवण्यात आली, पण या दहशदवाद्यांना हिंदू नावं का वापरली असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित करण्यात आला, त्यानंतर हे प्रकरण वर पर्यंत गेलं आणि भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून याची दखल घेण्यात आली.
माहिती प्रसारण मंत्रालयाकडू या दशदवाद्यांची हिंदू नावं का वापरली असा सवाल उपस्थित करण्यात आला, त्यानंतर आता नेटफ्लिक्सकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
यावर स्पष्टीकरण देताना नेटफ्लिक्स इंडियाच्या कंटेट हेड मोनिका शेरगिल यांनी म्हंटले आहे की, 1999 मध्ये इंडियन एअरलाईन्सच्या विमानत घडलेल्या घटनेबाबत ज्यांना माहिती नाही, त्यांच्यासाठी ही सीरिज आहे. पण आता ओपनिंग डिस्क्लेमरमध्ये हायजॅकर्सची जी खरी नावं आहेत, ती समाविष्ट केलेली आहेत.
“IC814- The Kandahar Hijack” ही वेब सीरिज 24 डिसेंबर 1999 रोजी इंडियन एअरलाइन्सच्या विमानाच्या अपहरणाच्या घटनेवर आधारित आहे. या विमानात 154 प्रवासी आणि क्रू मेंबर्स प्रवास करत होते. हे विमान काठमांडूहून दिल्लीला येणार होते पण विमानाने उड्डाण करताच 40 मिनिटांत दहशतवाद्यांनी त्याचे अपहरण केले. ज्या दहशतवाद्यांनी हे अपहरण केले ते पाकिस्तानस्थित हरकत-उल-मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. हे विमान त्यावेळी तालिबानच्या ताब्यात असलेल्या अफगाणिस्तानमधील कंदाहारच्या दिशेने वळवण्यात आले होते.