Bangladesh : उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील भारतीय जनता पक्षाचे खासदार साक्षी महाराज यांनी बांगलादेशातील अल्पसंख्याकांवरील हिंसाचारावर मोठे वक्तव्य केले आहे. यावेळी साक्षी महाराज म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे तेथील हिंदूंचे प्राण वाचले आहेत.” यावेळी खासदार म्हणाले की, बांगलादेशात जे काही घडले, ती अत्यंत चिंतेची बाब आहे. तिथल्या घटना खूप वेदनादायी आहेत.
मात्र, या गंभीर परिस्थितीत मोदींनी बांगलादेशातील हिंदूंना वाचवले आहे. पुढे त्यांनी विरोधकांना लक्ष करत म्हंटले, दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अल्पसंख्यांकांबाबत रात्रंदिवस डोके वर काढणारे गप्प आहेत.”
ते म्हणाले, “अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांच्यासह संपूर्ण भारत आघाडी अल्पसंख्यांकांबद्दल बोलतात परंतु आजपर्यंत त्यांनी बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समुदायाच्या बाजूने कोणतेही खुले विधान केलेले नाही. साक्षी महाराज म्हणाले की, भारतातील जनतेने हे समजून घेतले पाहिजे की त्यांचे समर्थक आणि रक्षक कोण आहेत.”
बांग्लादेशमध्ये शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन भारतात आल्यानंतर बांगलादेशमध्ये अनेक हिंदू मंदिरे, घरे आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांना लक्ष्य करण्यात आले. वादग्रस्त नोकरी कोटा प्रणालीवरून झालेले आंदोलन एवढे हिंसक होते की, शेख हसिना यांना देश सोडवा लागला होता.